शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी प्रवेशासाठी सोशल मीडियाचा वापर

By admin | Updated: April 29, 2016 02:07 IST

इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा दर्जेदार व मोफत शिक्षणाबरोबरच मुलांच्या आरोग्याची काळजी म्हणून पोषण आहार, लसीकरण आणि आरोग्य तपासणी आदी अनेक गोष्टी अंगणावाड्यांमध्ये उपलब्ध आहे

पुणे : पॉश युनिफॉर्म, टाय, शूज, बसायला बेंच हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील आकर्षण आता जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्येदेखील उपलब्ध असून, इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा दर्जेदार व मोफत शिक्षणाबरोबरच मुलांच्या आरोग्याची काळजी म्हणून पोषण आहार, लसीकरण आणि आरोग्य तपासणी आदी अनेक गोष्टी अंगणावाड्यांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आता महिला बालकल्याण विभागाच्या वतीनेदेखील सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.शासनाने बालकांचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअतंर्गत प्रत्येक खेडेगावात अंगणवाडी केंद्र सुरू केले. पुणे जिल्ह्यात आजअखेर तब्बल ४ हजार १६७ अंगणवाडी केंदे्र सुरू आहेत. या अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून प्रामुख्याने बालमृत्यू, कुपोषण व शारीरिक अपंगत्व टाळण्यासाठी ० ते ६ वयोगटातील बालकांना लसीकरण देणे, अंगणवाडीत येणाऱ्या बालकांना पोषण आहार देणे, गरोदर मातांची नोंद ठेवणे त्यांना आवश्यक असलेला औषधोपचार, गोळ््यांचा पुरवठा करणे आदी कामे करण्यात येत. याशिवाय इतरही अनेक सरकारी कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागत. यामुळे मात्र बालकांचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये बदल करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने दोन वर्षांपासून अंगणवाडी केंद्रातील ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी ‘पूर्वशालेय शिक्षण उपक्रम’ हा खास प्रकल्प सुरू केला आहे. या उपक्रमाअतंर्गत बालकांना खासगी प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी, केजीच्या मुलांच्या दर्जाचे शिक्षण सरकारी अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेच्या मार्गदर्शनासाठी बालकांसाठी ‘बालशिक्षणक्रम’ हा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या बोलक्या अंगणवाड्या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत असून, मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याऐवजी अंगणवाडीत प्रवेश घेऊ लागले आहेत. बोलक्या अंगणवाड्यांसाठी सर्व खर्च आतापर्यंत तब्बल १५ कोटी रुपये हे लोकसहभागातून करण्यात आला आहे. त्यामुळेच अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता व्हॉटस् अ‍ॅपद्वारे दीड ते तीन मिनिटांची व्हीडीओ क्लिप तायर करण्यात आली असून, जास्तीत जास्त मुलांनी अंगणवाडीत प्रवेश घेण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याचे कंद यांनी सांगितले.