शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फ्लाय अ‍ॅशचा वापर सक्तीचा

By admin | Updated: November 16, 2016 05:23 IST

राज्यातील विविध औष्णिक वीज केंद्रांमध्ये तयार होणारी प्रचंड राख (फ्लाय अ‍ॅश) त्यापासूनचे प्रदूषण, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे अनेकविध

मुंबई : राज्यातील विविध औष्णिक वीज केंद्रांमध्ये तयार होणारी प्रचंड राख (फ्लाय अ‍ॅश) त्यापासूनचे प्रदूषण, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे अनेकविध प्रश्न यावर कायमची मात करण्यासाठी या राखेचा वापर करणारे उद्योग या प्रकल्पांच्या परिसरातच उभारण्याची तरतूद असलेल्या एका व्यापक धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. वीजनिर्मिती केंद्रांच्या ३०० किलोमीटरच्या परिघातील बांधकाम साहित्यात फ्लाय अ‍ॅशचा वापर आता अनिवार्य करण्यात आला आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, या वीज केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून, तिथे राखेचा वापर करून विविध उत्पादने तयार करणाऱ्या उद्योगांची उभारणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. या उद्योगांना मूल्यवर्धित कर (वॅट) लागणार नाही. शासनाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्येही या उत्पादनांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. राज्यातील ७१ टक्के वीज ही १९ औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या वापरातून निर्माण केली जाते. या प्रकल्पांमध्ये वापरात येणाऱ्या एकूण कोळशाच्या ४० टक्के एवढी राख तयार होते. या राखेची पर्यावरणाचा विचार समोर ठेवून विल्हेवाट लावण्याची तरतूद आज मंजूर झालेल्या धोरणात करण्यात आलेली आहे. या राखेपासून विटा, दरवाजे, ब्लॉक्स् अन्य बांधकाम साहित्याची निर्मिती करणारे उद्योग उभारण्याची तयारी अनेक उद्योजकांनी दाखविली असून, असे धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे बावनकुळे म्हणाले. फ्लाय अ‍ॅशच्या प्रकल्पापर्यंतचा वाहतुकीचा खर्च औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांकडून करण्यात येईल. वीट उत्पादकांना २0 टक्के राख देण्यापूर्वी औष्णिक वीज निर्मिती केंद्रांनी यापैकी ७0 टक्के राख वीटनिर्मितीसाठी वापरली जाऊन नदीतील वाळूचा उपयोग पूर्णपणे टाळला जात असल्याची खात्री करणे आवश्यक असेल. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राख परिषद स्थापन करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)