शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

रासायनिक खतांचा हेक्टरी वापर घटतोय!

By admin | Updated: September 14, 2016 00:25 IST

दुष्परिणामाबाबत शेतकरी सतर्क; राज्यात रासायनिक खताच्या वापरात घट होत असून प्रति हेक्टर १७२ किलोवरुन १0७ किलोवर.

संतोष वानखडे वाशिम, दि. १३ : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. या अनुभवातूनच आता शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा अतिवापर टाळला असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २0१२ मध्ये राज्यात हेक्टरी १७२ किलोग्रॅम असलेला वापर २0१५ मध्ये १0७ किलोग्रॅमवर आला असून, २0१६ च्या खरीप हंगामात हा वापर सरासरी १00 किलोग्रॅमच्या आसपास असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.रासायनिक खते व कीटकनाशक औषधांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. तर दुसरीकडे अन्नधान्य व भाजीपालावर्गीय पिकांवर कीटकनाशकांचा होत असलेला अतिरिक्त फवारा मानवी आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढविणारा आहे. खतांचा अतिरिक्त वापर जमिनीचा पोत बिघडविणारा तर कीटकनाशकांचा जादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा आहे. खत व कीटकनाशक औषधींच्या वापराविषयी काही संकेत आहेत. यानुसार खताचा सरासरी वापर दर हेक्टरी ९५ किलोग्रॅमच्या आसपास असणे अपेक्षित आहे. हा वापर २0१२ पर्यंत सरासरी १७२ किलोग्रॅमपर्यंत पोहोचला होता, असे कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जमिनीचा पोत बिघडणे आणि भाजीपालावर्गीय पिकांसाठी धोकादायक ठरणे आदींचे महत्त्व शेतकर्‍यांना समजू लागल्याने त्यानंतर हळूहळू रासायनिक खतांचा अतिवापर कमी होत गेल्याचे दिसून येते. राज्यात सन २0११-१२ मध्ये दर हेक्टरी सरासरी १७२ किलोग्रॅम रासायनिक खतांचा वापर होता. सन २0१२-१३ मध्ये दर हेक्टरी ११९ किलोगॅ्रम, सन २0१४ मध्ये दर हेक्टरी १२५ अणि सन २0१५ मध्ये दर हेक्टरी १0७ किलोग्रॅम रासायनिक खतांचा वापर होता. २0१६ च्या खरीप हंगामातील निश्‍चित आकडेवारी राज्यस्तरावर अद्याप संकलित झाली नाही. तथापि, हा वापर दर हेक्टरी सरासरी १00 किलोग्रॅमच्या आसपास राहण्याची शक्यता कृषी विभागाच्या विश्‍वसनीय सूत्रांनी वर्तविली.