शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
6
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
7
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
8
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
9
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
10
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
11
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
12
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
13
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
14
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
15
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
16
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
18
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
19
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
20
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

उरणमध्ये अतिरेकी शिरले? मुंबईसह राज्यात हायअलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2016 01:43 IST

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह राज्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ : काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावरील हल्ल्याची घटना ताजी असताना रायगडमधील उरण येथे बोरीनाका परिसरात शााळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी चार सशस्त्र व्यक्ती संशयास्पद हालचाली करत नौदलाच्या तळाकडे जाताना पाहिल्याची माहिती समोर आल्याने देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह राज्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच हेलिकॉप्टर, एनएसजी कमांडो, फोर्सवनची तुकडी, नौदल व तटरक्षक दलाच्या ताफ्यासह खोल समुद्रात व किनारपट्टी परिसरात मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मात्र, रात्रीपर्यंत कोणासही पकडण्यात यश न आल्याने चिंतेचे वातावरण आहे. उरणमध्ये सकाळी शाळेत निघालेल्या यूईएस शाळेच्या एका विद्यार्थिनीला बोरीनाक्यावर चार संशयित व्यक्ती दिसल्या. पठाणी पेहराव, चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर अत्याधुनिक शस्त्रे आणि पाठीवर बॅग अशा अतिरेक्यांसारख्या पेहरावातील त्या संशयित व्यक्ती घातपाती कारवाया घडवून आणण्याची चर्चा करीत होते, असे या विद्यार्थिनीने शाळेत पोहोचल्यावर शिक्षकांना सांगितले. तर कुंभारवाडा रोडवर शाळेतच चाललेल्या एका विद्यार्थ्यानेही अशाचप्रकारे आपण दोन संशयितांना पाहिल्याचे सांगितले.

नौदलाचा तळ असलेल्या डोंगराकडे हे संशयित पायी चालत गेल्याची माहितीही त्याने दिली. हे दोन्ही विद्यार्थी यूईएसचेच. त्यांनी सांगितलेल्या घटनांची गंभीर दखल घेत शिक्षकांनी याबाबत शाळा संचालकांना कळवले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र भानुशाली, सचिव आनंद भिंगार्डे यांनी त्वरित ही माहिती उरण पोलिसांना दिली. उरण पोलिसांनी लागलीच अतिरिक्त कुमक मागवून बंदोबस्तात वाढ केली. शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस तसेच इतर रासायनिक कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली.

संशयिताचे रेखाचित्र विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या वर्णनावरुन उरणच्या स्थानिक पोलिसांनी एका संशयिताचे रेखाचित्र तयार केल्याचे नवी मुंबईच्या गुन्हे शाखेचे डीसीपी दिलीप सावंत यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. दरम्यान, पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी रात्री उशीरा शोध मोहिम थांबविली असून काही विशिष्ट ठिकाणांवर मात्र सुरक्षा यंत्रणांची चोख नजर असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले           . 

शाळांना सुट्टी देण्यात आली. नवी मुंबईचे आयुक्त हेमंत नागराळे व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही उरण पोलीस ठाण्यात तातडीने धाव घेवून संबंधित विद्यार्थी व शिक्षकांकडून संशयितांबाबत सखोल माहिती घेतली. त्याबाबत सर्व गुप्तचर यंत्रणांना कळवून सतर्कतेचा इशारा दिला. उरण येथे ओएनजीसीचा प्रकल्प आहे. तसेच समुद्रमार्गे गेटवे आॅफ इंडिया, राजभवनला पोहोचणे शक्य असल्याने घातपात करण्याचा अतिरेक्यांचा डाव असावा, या शक्यतेने नवी मुंबई, मुंबईसह, रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेट वे, ताज हॉटेल व अन्य महत्त्वाच्या ठिकाणाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. नौदलाच्या हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत समुद्रकिनाऱ्यावर टेहळणी सुरू होती. किनाऱ्यावरील लॉज, हॉटेलची झडती घेण्यात येत असून ‘सर्च आॅपरेशन’ सुरू आहे. मात्र कोणीही संशयित व्यक्ती, वस्तू आढळून आली नसल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

उरण परिसराचे महत्त्व उरण येथे नौदलाचा आयएनएस अभिमन्यू हा तळ तसेच शस्त्रागारही असल्याने हा संवेदनशील परिसर आहे. त्याचप्रमाणे हे बंदर तसेच तेलकंपन्यांच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे या परिसरात जेएनपीटी तसेच ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस तसेच इतर रासायनिक कंपन्या आहेत. येथून समुद्रमार्गे तातडीने गेटवे आॅफ इंडियाला पोहोचणे शक्य असल्याने त्याठिकाणी घातपात करण्याचा अतिरेक्यांचा डाव असावा, या शक्यतेने नवी मुंबई, मुंबईसह, रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला.

- सर्च आॅपरेशन सुरु उरणमध्ये दोन विद्यार्थ्यांनी शस्त्रधारी युवक पाहिल्याबाबत वेगवेगळी माहिती दिली आहे. त्याची शाहनिशा करण्यात येत असून ‘सर्च आॅपरेशन’ राबविले जात आहे.  सुरक्षेच्या दृष्टिने योग्य खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. संशयास्पद व्यक्ती, वस्तूबाबत तातडीने पोलिसांना कळवावे. -  सतीश माथूर, पोलीस महासंचालक 

 - गृहसचिवांनी अहवाल मागविला उरणमध्ये अतिरेकी शिरल्याबाबत सविस्तर अहवालाची मागणी गृहसचिव के. पी. बक्षी यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे. शुक्रवार दुपारपर्यंत अहवाल दिला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

- उरणमध्ये काही संशयित दहशतवादी दिसून आल्याची माहिती मिळताच नौदलाच्या पश्चिम विभागाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. पठाणी वेषातील ४-५ जणांचे शस्त्रसज्ज टोळके उरणमध्ये आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर नौदलाने ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. नौदल पश्चिम विभागातील सर्वच आस्थापना आणि कार्यालयांची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून प्रत्येकाची कसून चौकशी सुरू आहे. याशिवाय, संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सागरी सुरक्षेशी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे. तटरक्षक दल, पोलिस यंत्रणांच्या समन्वयातून संशयिताचा शोध जारी आहे. मात्र. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. - कमांडर राहुल सिन्हा, नौदलाचे जनसंपर्क अधिकारी

पालघर समुद्रकिनारी शोधमोहीम उरण येथे संशयित अतिरेकी दिसल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात शोधमोहीम हाती घेत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्याला १०७ किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. तारापूर येथे अणुऊर्जा केंद्र आणि डहाणू येथे रिलायन्सचा वीजप्रकल्प आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्याहून अतिरेकी मुंबईत घुसले होते. त्यामुळे उरण येथे अतिरेकी दिसल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील झाई ते पाचूबंदर समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात गस्त घातली जात आहे. पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश असून नाकाबंदी करून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे, असे पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी सांगितले.