शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही त्वरित कर्जमाफी द्या - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 4, 2017 21:48 IST

उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली पाहिजे. जर उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकते तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तरी कर्जामाफीबाबत मागे का राहावे, असा सवाल उद्धव यांनी केला आहे. 
उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. निवडणूक प्रचारात दिलेले वचन योगी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पूर्ण केले, हे अभिमानास्पद आहे. कर्जमाफीचा घोषणा म्हणजे केवळ निवडणुकीतील पोकळ दावा नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच जर   उत्तर प्रदेशसारख्या देशातील सगळ्यात मोठ्या राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, तर मग कृषिप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मागे का राहावे," असा सवाल त्यांनी केला. 
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींबरोबरच कर्जबाजारीपणा हे त्यामागचे मोठे कारण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही शिवसेनेची मागणी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंपल्पीय अधिवेशनात  विरोधकांबरोबरच शिवसेनेनेही सत्ताधारी भाजपाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कोंडीत पकडले होते. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कर्जमाफीसाठी राज्यव्यापी संघर्षयात्रा काढत राज्यातील वातावरण ढवळून काढले आहे. आता उत्तर प्रदेशातही कर्जमाफी झाल्याने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्जामाफीच्या मुद्यावर तोडगा काढताना दमछाक होणार आहे.