शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

मराठी माध्यमाच्या शाळातून उर्दूचे धडे

By admin | Updated: July 19, 2016 20:24 IST

राज्यातील निवडक मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू विषयाचे धडे दिले जाणार आहे. या १०० शाळांतील इयत्ता सहावी व सातवीसाठी उर्दू हा विषयक संयुक्त स्तरावर

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि.19 -  राज्यातील निवडक मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू विषयाचे धडे दिले जाणार आहे. या १०० शाळांतील इयत्ता सहावी व सातवीसाठी उर्दू हा विषयक संयुक्त स्तरावर प्रायोगिक तत्त्वानुसार सुरू करण्यात येणार आहे.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ नुसार बहुभाषिक वर्ग हा एक संसाधन म्हणून उपयोगात आणावा, अशी शिफारस आहे, ही शिफारस लक्षात घेता शालेश शिक्षण विभागाने मराठी माध्यमांच्या शाळांमधून उर्दू भाषा विषयाचे अध्यापन करण्याचे निर्देश दिले आहेत. १०० शाळांची निवड करताना जिल्हापरिषद व महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या मराठी माध्यमांच्या शाळा व ज्यांच्या परिसरात उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत, अशा शाळांची निवड प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना करायची आहे. असा बहुभाषिक वर्ग निर्माण केल्याने विविध भाषांमधील शब्दांचे, संकल्पाच तसेच संस्कृतीचे आदानप्रदान होवून विद्यार्थी बहुश्रुत होती. सदर हेतू लक्षा घेऊन या अनुषंगाने शासनाने बदल सुचविले आहे. इयत्ता ६ वी व ७ वीच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील मराठी या प्रथम विषयासह अन्य विषय शिकविले जातील हिंदी द्वितीय भाषा म्हणून शिकविले जात असताना यात उर्दू संयुक्तपणे शिकविले जाईल.भारताप्रमाणे महाराष्ट्रातही बहुभाषिक रहिवासी आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा असली तरी इतर नऊ माध्यमांतून शिक्षण घेण्याचे पर्याय विद्यार्थ्यांना दिले आहेत. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम १ ते ८ वी विषय योजनेस मान्यता दिली आहे.प्रचलित विषय योजनेत इयत्ता ७ वी पर्यत मराठी माध्यमातीन विद्यार्थ्यांना केवळ मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषा शिकण्याची मुभा आहे. या विषय रचनेचा विचार करता मराठी माध्यमाच्या शालेय अमराठी भाषिक विद्यार्थी विशेषत: उर्दू भाषिक विद्यार्थी असल्यास ते मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच उर्दू शिक्षण औपचारिकरित्या घेता येण्यासाठी प्रचलित विषय योजनेतील मराठी माध्यमाच्या इयत्ता ६ वी व इयत्ता ७ वी च्या विषय रचनेत बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)हिंदीला उर्दूची जोड१०० मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी (द्वितीय संपूर्ण) ऐवजी हिंदी (संयुक्त), उर्दु (संयुक्त) हे विषय घेता येतील.प्रचलित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या उर्दू (संयुक्त) या विषयाच पाठ्यक्रम व अनुषंगिक पाठयपुस्तकाचा वापर मराठी माध्यमाच्या शाळामध्ये उर्दु (संयुक्त) अध्यापन करताना करावा.हिंंदीच्या एकूण चार तासिकांपैकी हिंदी संयुक्त २ तासिका व उर्दू संयुक्त २ तासिका विभाजित करण्यात याव्यात.प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीशाळेमध्ये र्उूु विषय सुरू करण्याबाबत जिल्हा शिक्षणाधिकरी (प्राथमिक) यांची मान्यता घेणे आवश्यक राहील.सदर शासन निर्णय सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये उर्दू शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेच्या परिसरात उपलब्ध असेल, अशा केवळ १०० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येईल.