शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांची नगरविकास सचिवांकडून दखल

By admin | Updated: August 15, 2016 05:02 IST

जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्याप्रमाणात हैदोस सुरू आहे.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्याप्रमाणात हैदोस सुरू आहे. त्यावर गांभीर्याने तोडगा काढला जात नसल्यामुळे त्यांचा उपद्रव वाढला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात तीन महिन्यांच्या कालावधीत कुत्र्यांनी दोन हजार ७५७ जणांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांंमुळे नगरविकास सचिवांनी आता प्रशासन सतर्क केले आहे. सध्या ही जिल्ह्यातील शहरे व निवासी वस्त्यांमधील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे. गर्भधारणेच्या या कालावधीत त्यांचे रेबीज जीव घेणे ठरत आहेत. चावा घेतल्यानंतर वेळीच औषधोपचार न झाल्यामुळे जीवाला मुकावे लागल्याच्या घटना या आधी घडल्या आहेत. परंतु मागील तीन महिन्यातील घटनांमध्ये सर्वाना वेळेत रेबीजचे इंजेक्शन देऊन संकटातून मुक्त केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांव्दारे केला जात आहे. या घटना टाळण्यासाठी संभाव्य उपाययोजनांबाबत मात्र त्यांच्याकडून मौन बाळगले जात आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात तीन महिन्यात सुमारे एक हजार १५० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मे महिन्यात सर्वाधिक ५०६ जणांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्याना चावा घेतला आहे. या खालोखाल जूनमध्ये ४११ जणांवर तर जुलैमध्ये २३३ जणाचा कुत्र्यांनी वेठीस धरून चावा घेतला आहे. याप्रमाणेच जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधील एक हजार ६०७ जणांना देखील कुत्र्यांच्या जीव घेण्या हल्यास तोंड द्यावे लागले आहे. यात सर्वाधिक भिवंडी तालुक्यातील ७१९, अंबरनाथमधील ४३७, शहापूरचे २३५, मुरबाडमधील १४८ आणि कल्याण ग्रामीणच्या ६८ जणांना कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केल्याचे निदर्शनात आले आहे. कुत्र्यांच्या या जीव घेण्या हल्लास गांभीर्याने घेतल्याचे स्थानिक प्रशासनाकडून दाखविले जात आहे. त्या नावाखाली लाखो रूपयांचे खर्च कुत्र्यांच्या नसबंदीवर केल्याचे ही निदर्शनात आले आहेत. मात्र कुत्र्यांचा हैदास अद्यापही कमी होत नसल्यामुळे नागरिकांना जीव घेण्या हल्ल्यास तोंड द्यावे लागत आहे. केवळ खर्चावर जोर देणाऱ्या स्थानिक प्रशासनावर आता नगरविकास विभागाच्या सचिवांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवणे, रेबीज निर्मुलन करणे आणि नागरिकांवर होणारे कुत्र्याचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना व देखरेख समिती ठिकठिकाणच्या पातळ्यावर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ठाणे ते माजिवडा ही मार्ग क्र. २७ ची बस दुपारी २ च्या सुमारास रेल्वे स्थानक येथून माजिवडा गावात आली. तिथून ती परतीच्या मार्गावर होती. तत्पूर्वी चालक यशवंत राव यांना गाडी मागे घेण्यासाठी थोरात हे मदत करत होते. त्याच वेळी एका पिसाळलेल्या श्वानाने त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला. अचानक गुदरलेल्या या प्रसंगामुळे थोरात यांची भंबेरी उडाली. याच बसमधून रेल्वे स्थानकावर जाणारे टीएमटीचे वाहतूक निरीक्षक सुनील साठे, गणेश माहूलकर यांच्यासह चालक यशवंत यांनी त्यांना तातडीने ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुगणालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.