शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

उरणचे सबस्टेशन आगीत खाक

By admin | Updated: October 24, 2014 04:08 IST

उरणच्या जीटीपीएस प्रकल्पातील ट्रान्सफार्मरला भीषण आग लागून ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनच जळून खाक झाले.

चिरनेर /उरण : उरणच्या जीटीपीएस प्रकल्पातील ट्रान्सफार्मरला भीषण आग लागून ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनच जळून खाक झाले. त्यामुळे ऐन दिवाळीत उरणकरांची दिवाळीची पहाट अंधारानेच सुरू झाली. तर या घटनेमुळे संपूर्ण तालुक्याचाच वीजपुरवठा खंडित झाला होता. एमव्हीए ५० ट्रान्सफॉर्मर नं. २ या ट्रान्सफॉर्मरला ही आग लागली. या आगीचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी शार्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जीटीपीएसच्या या ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाल्याचे दिसून येत होते. या दुर्घटनेमुळे या प्रकल्पातील विजेच्या आधारावर सुरू असणाऱ्या इतर प्रकल्पांचे कामकाजही ठप्प झाले आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष देऊन होते. बोकडविऱ्यापासून काळाकुट्ट धूर अगदी ५ कि.मी.च्या परिसरात पसरल्याचे दिसत होते.जीटीपीएस, ओएनजीसी, जेएनपीटी आणि सिडकोच्या चार बंबांनी दोन-दोन वेळा बाहेरून पाणी आणून तब्बल साडे तीन तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत तब्बल ५० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. चार हजार लीटर आॅइलचा साठा असलेल्या या विभागात स्वत:ची आग विझविण्याची यंत्रणाच नसल्याचे यानिमित्ताने समोर आले. उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे म्हणाले की, आग विझविण्याची यंत्रणा या ठिकाणच्या अनेक प्रकल्पांत नाही ही गंभीर बाब आहे. (वार्ताहर)