शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुका ताकदीने लढणार

By admin | Updated: June 13, 2016 01:46 IST

राज्यातील सर्व आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीने लढवेल व जिंकेल, असा आत्मविश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (दि. १२) व्यक्त केला.

इंदापूर : राज्यातील सर्व आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीने लढवेल व जिंकेल, असा आत्मविश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (दि. १२) व्यक्त केला. ते येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. माजी आमदार उल्हास पवार या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. विधानसभा निवडणुकीनंतर झालेला हा त्यांचा पहिलाच मेळावा होता. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या वेळी चव्हाण यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, राज्य व केंद्र सरकार गेल्या दोन वर्षांत सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळाकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. केवळ जाहिरातबाजीच्या जोरावर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारचे खरे रूप लोकांना दिसून आले आहे. जनता त्यांना कंटाळली आहे. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली, तर मुख्यमंत्री हट्टाने ती नाकारतात, असे सांगून ते म्हणाले की, शेतकऱ्यांना शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी. पुणे-मुंबई बुलेट ट्रेनला एक लाख कोटी रुपये निधी देण्याऐवजी तो निधी राज्यातील सिंचन प्रकल्पांना दिला जावा, अशी आमची मागणी आहे.मेळाव्याचे आयोजक माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत तालुक्यातील २२ गावांना खडकवासला, शेटफळ हवेली तलाव व नीरा डाव्या कालव्यातून पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, उजनी धरण पाणलोट क्षेत्रात आठ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय त्यांनी केवळ दहा मिनिटांत घेतला होता. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सेना-भाजपामधील संबंध पाहता, विधानसभेची मध्यावधी निवडणूक कधीही लागू शकेल, अशी परिस्थिती आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या वेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, विलासराव वाघमोडे यांची भाषणे झाली. अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. >एकच जागा : अडचणीची स्थितीहर्षवर्धन पाटील हे कार्यक्षम, अभ्यासू नेते आहेत. ते आमच्या समवेत असले पाहिजेत, यासाठी विधान परिषदेच्या जागावाटपात आपण त्यांच्यासाठी आग्रही होतो. मात्र, एकच जागा मिळाली. अडचण निर्माण झाली. तथापि, त्यांना आम्ही फार काळ बाहेर ठेवणार नाही, असे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले.