शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद कर्मचाऱ्यांचा उद्याचा बेमुदत संप अटळ

By admin | Updated: July 14, 2014 03:43 IST

राज्यातील २३५ नगर परिषदांमधील ७० हजार कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जात आहेत.

मुंबई : राज्यातील २३५ नगर परिषदांमधील ७० हजार कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जात आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांवर साधी चर्चा करण्याचे औदार्यही नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दाखविलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कायम सेवेतील आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांनी संघर्ष समिती स्थापत संपाचा पवित्रा कायम ठेवला.गेल्या सहा महिन्यांपासून वेतन आणि पेन्शन मिळाली नसल्याने कायम सेवेत आणि रोजंदारीवर असलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नगर परिषदांमध्ये वित्तीय तूट निर्माण झाल्याने वेतन आणि पेन्शन थकल्याचा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी केला आहे. शासनाने जकात रद्द करून सहायक अनुदान देण्यास सुरुवात केल्यानंतर ही समस्या उद्भवल्याचे घुगे यांचे म्हणणे आहे.यासंदर्भात गेल्या चार महिन्यांत नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासोबत संघर्ष समितीने तीन बैठका घेतल्या. मात्र त्यात तोडगा निघू शकलेला नाही. संघटनेने जून महिन्यात केलेल्या भीक मांगो आंदोलनादरम्यान सामंत यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्री दूरच स्वत: सामंतही शिष्टमंडळाला भेटले नसल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. (प्रतिनिधी)