शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: May 14, 2017 02:14 IST

महाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, महाड एमआयडीसीलगत असणाऱ्या धामणे, जिते, टेमघर, शेलटोली या गावांना शुक्रवारी रात्री ८ वाजता पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. धामणे गावातील लक्ष्मण विठ्ठल खराडे याच्या घराचे पत्रे उडून गेले, तसेच वीजमीटरची मोडतोड झाली. शेलटोली सजाचे तलाठी एस. एम. चाटे यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार खराडे यांच्या घराचे वादळी पावसामुळे १ लाख १३ हजार ६५० रु पयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच धामणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया अशोक चिकणे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पवार, माजी सरपंच शेखर राखाडे यांनी या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाचे तलाठी एस. एम. चाटे यांच्या मार्फत करून घेतला. तर जिते येथील शोभा रमेश मोहिते यांचे घर या वादळी पावसात पडल्याने ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेलटोली येथील शेतकरी मनोहर मारु ती गायकवाड यांच्या वाड्याची भिंत कोसळून गाईचा मृत्यू झाल्याने २१ हजार रु पयांचे नुकसान झल्याची माहिती तलाठी एस. एम. चाटे यांनी दिली आहे. तालुक्यातील अन्य ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदार सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.वादळी पावसामुळे टेमघर, जिते परिसरातील वीज खांब कोलमडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरण मार्फत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व खांब उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.आंबा पिकाचे नुकसान; शेतकरी चिंतातूरम्हसळा : पावसाने नागरिकांसह व्यापारी, वीजभट्टीचालकांची तारांबळ उडाली. शुक्रवारी रात्री काही परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ऐन बहारात आलेल्या आंबा पिकाचे अवकाळीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्यात सर्वत्र आंबा पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी होऊ लागली आहे.म्हसळा येथील जुन्या सरकारी दवाखान्याशेजारील कर्मचारी निवासस्थान, तसेच पंचायत समिती येथे पावसामुळे झाड तारेवर पडून विजेचा खांब कोसळला. पावसाच्या शिडकाव्याने आंबे काढणीला वेगरेवदंडा : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान होऊ नये, म्हणून शनिवारी सकाळपासून आंबे काढून घेण्यासाठी पाडेकरी वर्गाला घेऊन आंबे उतरवण्याची लगबग जाणवत आहे. उतरवलेले आंबे विक्र ीसाठी पाठवण्याची तयारी एकीकडे दिसत असून, पुन्हा एकदा आंबा बागायतदारांकडून खोके, करंड्या, पेपर रद्दी, सुतळ यांना मागणी वाढली आहे. आंब्याचे दर अद्याप भडकलेलेच असल्याने सर्वसामान्यांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. मुरु डमध्ये आंबा बागायतदार, वीटभट्टीचालकांचे नुकसानआगरदांडा : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना शुक्रवारी सुटलेल्या सोसाट्याचा वारा आणि पावसाने काहीसा दिलासा दिला. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक गर्मीने हैराण होते. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी वीजखांब पडले, तर काही ठिकाणी वीज वाहिन्या पडल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले.लहान मुलांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. अचानक आलेल्या पावसाने वीटभट्टीचालकांचे नुकसान झाले. तसेच आंबा बागायतदारांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले. बोर्लीत तब्बल १३ तासांनी वीज पूर्ववतबोर्ली मांडला : बोर्ली मांडला विभागामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी शुक्रवारी बरसल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तो तब्बल १३ तासांनी म्हणजेच शनिवारी सकाळी पूर्ववत करण्यात महावितरणला यश आहे. पाऊस आला असला तरी वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. काशीद तसेच काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.