शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पुढील ३ दिवसांत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाचा मारा; हवामान खात्याचा अंदाज

By सचिन लुंगसे | Updated: April 10, 2024 21:02 IST

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे

मुंबई : राज्याला बसणा-या उन्हाच्या झळा कायम असून, बुधवारी मालेगावचे कमाल तापमान ४२ अंश नोंदविण्यात आले आहे. उर्वरित शहरेही ३८ अंशावर जाऊन ठेपली असतानाच पुढील ३ दिवसांसाठी राज्यातील बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाचा मारा होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशावर स्थिर असले तरी वाढती आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत असल्याचे चित्र आहे.खान्देश, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात ३ दिवस म्हणजे गुरुवार ते शनिवारपर्यंत  मध्यम अवकाळी (वीजा, वारा, गारा ) पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात वातावरण कोरडे राहणार असुन दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक असेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्येमुंबई ३३ठाणे ३९.२मालेगाव ४२जेऊर ४१.५बीड ४०.५सोलापूर ४०अहमदनगर ३९.८धाराशीव ३९.५सातारा ३९.१सांगली ३८.९छत्रपती संभाजी नगर ३८.६परभणी ३८.३कोल्हापूर ३८.२जळगाव ३८नाशिक ३७.८