शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

सांस्कृतिक दहशतवाद अस्वस्थ करणारा

By admin | Updated: December 21, 2015 00:28 IST

‘सांस्कृतिक दहश्तवादाला कळत नकळत राज्यकर्त्यांकडून दिला जाणारा पाठिंबा अस्वस्थ करणारा आहे. पुरस्कार वापसीच्या माध्यमातून व्यक्त केली जाणारे तीव्र भावना

पुणे: ‘सांस्कृतिक दहश्तवादाला कळत नकळत राज्यकर्त्यांकडून दिला जाणारा पाठिंबा अस्वस्थ करणारा आहे. पुरस्कार वापसीच्या माध्यमातून व्यक्त केली जाणारे तीव्र भावना चुकीची नाही,असे मत ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. प्रतिमा पब्लिकेशन्सतर्फे प्रा.फ.मुं. शिंदे यांच्या ‘फ. मुं. शिंदे समग्र कविता संग्रह खंड - 1’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पवार व शिंदे यांची प्रा. मिलिंद जोशी यांनी मुलाखत घेतली. पिंपरी चिंचवड येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, लीला शिंदे , करण ग्रुपचे अध्यक्ष कल्याण तावरे, दीपक चांदणे,आदी उपस्थित होते.सांस्कृतिक दहशतवादावरील प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, कला हे माध्यम असून कलेच्या माध्यमातून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जातो. बाजीराव मस्तानी चित्रपटाचे शो बंद पाडणे अयोग्य आहे. तुुम्हाला पसंत नाही तर तुम्ही पाहू नका. परंतु ,ज्यांना चित्रपट पहायचा आहे , त्यांना अडवू नका. एखाद्या कलाकृतीतील प्रत्येक मताशी आपण सहमत असूच असे होत नाही. त्यातच राज्याकर्त्यांकडून अशा गोष्टींना कळत नकळत पाठिंबा दिला जातो. ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. घाशीराम कोतवाल नाटकाच्या वेळीही विरोध झाला होता. त्यामुळे मीच ते नाटक पाहण्यासाठी गेलो. पुढे ते नाटक जागतिक पातळीवर गेले.पुरस्कार वापसीवर बोलताना पवार म्हणाले, ‘‘ राज्यकर्त्यांकडूनच केवळ पुरस्कार परत करून का तर पुरस्काराबरोबर देण्यात आलेली रक्कम व्याजासह परत करा,अशा प्रकारे सत्ताधा-यांकडून चमत्कारिक व्यक्तव्य केले जाते.त्यातून संबंधितांचा दृष्टीकोन लक्षात येतो. त्यामुळे ,समाजातून तीव्र मत व्यक्त केले तर त्यात चुकीचे काही नाही.’’माझा मुळ विषय गणित होता. परंतु. परिस्थितीनुरूप गणित बदलत गेले ,असे सांगत फ.मुं.शिंदे म्हणाले, बहुतांश सर्व विद्यापीठांमध्ये माझ्या कविता अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांनी माझ्या साहित्यावर पीएच.डी.केली. तसेच माझ्या लिखाणाचेही नेहमी स्वागत केले आहे. निवडणुकीची आवड असल्याने मी अपक्ष उभा राहिलो. संधी मिळाली तर नकीच राजकीय क्षेत्रात काम करायला आवडेल.’’