नागपूर : फौजदारी अवमानना प्रकरणात अॅड. सतीश उके यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्यांना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. न्यायालयात उपस्थित न राहिल्यास प्रबंधक कार्यालयात जमा असलेली त्यांची सुरक्षा रक्कम जप्त करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी तंबीही न्यायालयाने दिली आहे.या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होती. त्या वेळी उके यांना न्यायालयात उपस्थित राहायचे होते. परंतु, त्यांनी व्यक्तीश: उपस्थित न राहता अॅड. सी. जे. जोवेसन यांना न्यायालयात हजर केले. तसेच, प्रकरणावरील सुनावणी तहकूब करण्यासाठी अर्ज सादर केला. त्यावरून न्यायालयाने संतप्त होऊन उके यांना फटकारले. (प्रतिनिधी)
सतीश उके यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
By admin | Updated: February 25, 2017 04:42 IST