शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लॉजना नियमबाह्य परवाने

By admin | Updated: August 11, 2014 03:29 IST

बहुतांशी लॉजिंग व बोर्डींगच्या बेकायदेशीर बांधकामांना स्थानिक राजकीय मंडळी व पालिकेतील भ्रष्ट अधिकारी पाठिंबा देत असल्याने शहरात हा व्यवसाय फोफावला आहे.

राजू काळे, भार्इंदरशहरातील बहुतांशी लॉजिंग-बोर्डींगमध्ये अनैतिक व्यवसाय चालत असताना या व्यवसायाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील उपविभागीय कार्यालयाकडून नियमबाह्य परवाने देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून उजेडात आला आहे.येथील बहुतांशी लॉजिंग व बोर्डींगच्या बेकायदेशीर बांधकामांना स्थानिक राजकीय मंडळी व पालिकेतील भ्रष्ट अधिकारी पाठिंबा देत असल्याने शहरात हा व्यवसाय फोफावला आहे. या अनधिकृत बांधकामांना न्यायालयाकडून सहज स्थगिती मिळत असल्याने पालिकेच्या कारवाईपासून ते काही काळ बचावतात. पुढे ते नियमित होतात तर काहींची सेटींग तुटल्याने जमीनदोस्त होतात. या कायदेशीर-बेकायदेशीर लॉजिंग-बोर्डींगला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील उपविभागीय कार्यालयातूनही नियमबाह्य परवानांच्या माध्यमातून पाठिंबा मिळत आहे. या लॉजच्या व्यवसायाला भरभराट यावी, म्हणून पालिकेकडूनही बेकायदेशीरपणे सर्व पायाभूत सुविधा तसेच वीजकंपनीकडून वारेमाप वीजपुरवठा करण्यात येतो. शिवाय गृहखात्याकडून या लॉजच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळली जाते. यामुळे चहूबाजूंनी सरकारी बाबूंचे पाठबळ मिळत असल्याने शहरात अनैतिक व्यवसायाला खतपाणी मिळत आहे. या लॉजना नियमबाह्य परवाने देण्यात येत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता नीलेश फाफाळे यांनी घेतलेल्या माहितीवरून उजेडात आले. काशिमीरा येथील काजल नामक लॉजला सप्टेंबर २०१३मध्ये ठाणे उपविभागीय कार्यालयातून परवाना दिला होता. त्यासाठी अपर तहसीलदार कार्यालयातून देलेली अकृषीक (एनए) व पालिकेकडून देण्यात आलेला कर आकारणीचा दाखला सादर करण्यात आला होता. देण्यात आलेले दाखले तात्पुरते, नियमबाह्य व बनावट असल्याचेही त्यावेळी समोर आले होते. पालिकेने घेतलेल्या सुनावणीवेळी कर आकारणीचा दाखला रद्द करण्यात आला. परवाना देतेवेळी आवश्यक असलेल्या पालिकेची बांधकाम परवानगी, अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसतानाही उपविभागीय कार्यालयाने परवाना दिल्याचा प्रकार उजेडात आला.