शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांवर अन्यायच !

By admin | Updated: April 28, 2016 03:02 IST

एमआयडीसीमधील सर्व कंपन्यांना कुशल व अकुशल कामगारांची नियुक्ती करताना जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याची अट घातली आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई-एमआयडीसीमधील सर्व कंपन्यांना कुशल व अकुशल कामगारांची नियुक्ती करताना जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याची अट घातली आहे. करारामध्ये तसे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे, परंतु सद्य:स्थितीत स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये डावलले जात असून, नोकरीचा हक्क मिळविण्यासाठीही आगरी कोळी युथ फाउंडेशनने पाठपुरावा सुरू केला आहे. शासनाने सिडकोची स्थापना करण्यापूर्वीच एमआयडीसी वसविण्यासाठी दिघा ते नेरूळपर्यंतची जमीन संपादित केली. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी २,५६० हेक्टर जमीन शासनाला दिली. या मोबदल्यात अत्यंत कमी रक्कम त्यांना मिळाली. जमीन गेल्यामुळे उत्पन्नाचे दुसरे साधन राहिले नसल्याने येथे उभारण्यात येणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य मिळावे, असे धोरण निश्चित केले. येथील कंपन्यांबरोबर करार करताना ही अट त्यांना घालण्यात येते. सद्य:स्थितीमध्ये देशातील सर्वात महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. रिलायन्सचे मुख्यालय याच परिसरात आहे. सर्वात मोठा केमिकल व आयटी झोन या ठिकाणी आहे. दोन लाख नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु यामध्ये प्रकल्पग्रस्त कामगारांची संख्या नगण्य आहे. एमआयडीसीची उभारणी झाली तेव्हा नोसील, हार्डेलियासह बहुतांश सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना व या शहरामध्ये राहणाऱ्या इतर नागरिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात आले. महापालिकेचे विद्यमान सभागृह नेते जयवंत सुतार हे सद्य:स्थितीतही हार्डेलिया कंपनीमध्ये नोकरी करीत आहेत. याप्रमाणे अनेकांना नोकऱ्या मिळाल्या होत्या. परंतु मागील २० वर्षांमध्ये आलेल्या नवीन कंपन्यांमध्ये स्थानिकांना डावलण्याची स्पर्धाच सुरू झाली. शिक्षण घेतलेल्या तरुणांनाही नोकरी मिळत नसल्याने गावांमध्ये बेरोजगारी वाढू लागली आहे. नवी मुंबईमधील केमिकल कंपन्या बंद होत चालल्या आहेत. आयटी कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सद्य:स्थितीमध्ये ५१६ आयटी कंपन्या कार्यरत आहेत. पुढील पाच वर्षांत हीच संख्या एक हजारांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. परंतु या कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्त व शहरातील इतर स्थानिकांनाही नोकरी मिळत नाही. नोकरीसाठी अर्ज केला तर शैक्षणिक पात्रता नसल्याचे कारण सांगितले जात आहे, परंतु यामध्ये फारसे तथ्य नाही. प्रकल्पग्रस्त तरुणांनीही आता उच्च शिक्षण घेतले आहे. एमआयडीसीमध्ये ज्या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध आहेत, त्याविषयी प्रशिक्षण त्यांना दिले तर नोकरी उपलब्ध होण्यास मदत होेऊ शकते. परंतु सद्य:स्थितीमध्ये अशाप्रकारे प्रशिक्षण देणारी व नोकरीविषयी जागृती करणारी यंत्रणा एमआयडीसी, शासन यांच्याकडे नाही. स्थानिकांना रोजगार देण्याची उद्योजकांचीच मानसिकता नसल्याने ज्यांच्या जमिनीवर कारखाने उभे राहिले त्या शेतकऱ्यांच्या मुलांना बेरोजगारीचे जीवन जगावे लागत आहे. ।बामन लॉरी पॅटर्न राबवा एमआयडीसीमधील बामन लॉरी कंपनीमध्ये कुकशेत गावातील ११ कायम व सहा कंत्राटी कामगार होते. सदर कंपनी बंद झाल्याने कायम कामगारांना व्हीआरएस देण्यात आला. यानंतर २००८ मध्ये कंपनीचे मुंबईमधील युनिट नवी मुंबईत हलविल्यानंतर कुकशेतमधील तेव्हाचे युवा कार्यकर्ते व विद्यमान नगरसेवक सूरज पाटील यांनी आंदोलन केले. कंपनीने तुमच्याकडे कुशल कामगार नसल्याचे सांगितले. पाटील यांनी तुम्ही नोकरीवर घेऊन एक वर्ष ट्रेनिंग द्या व नंतर कायम करा, अशी भूमिका घेतल्यानंतर जवळपास २० जणांना कामावर घेतले. एक वर्ष ट्रेनिंग व एक वर्ष अनुभवासाठी अशी दोन वर्षे प्रशिक्षण देऊन सर्व कामगारांना कायम केले. हाच पॅटर्न इतर ठिकाणी राबवून प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे सूरज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.