शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला ‘प्रपोपीस आफ्रिकाना’चे पेटंट

By admin | Updated: August 8, 2015 00:45 IST

संशोधकांची कामगिरी : नायजेरिया विद्यापीठासमवेतच्या करारातून साध्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि नायजेरिया विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनामधून पेटंटची निर्मिती झाली आहे. आफ्रिकेमध्ये वाढणाऱ्या ‘प्रपोपीस आफ्रिकाना’ (ढ१ङ्मस्रङ्मस्र्र२ आ१्रूंल्लं) या झाडाच्या सालीमधून निघणाऱ्या रसायनाच्या औषधी वापराबाबतचे हे पेटंट आहे. शिवाजी विद्यापीठ व नायजेरिया विद्यापीठ यांच्यात सन २०१२ मध्ये संशोधनविषयक सामंजस्य करार झाला आहे. नायजेरिया विद्यापीठातील महिला संशोधक डॉ. पेत्रा ओ. एन. यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून (डी.एस.टी.) ‘डॉ. सी. व्ही. रामन फेलोशिप फॉर आफ्रिकन कंट्रीज’ ही शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत डॉ. पेत्रा शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात प्रा. लोखंडे यांच्या प्रयोगशाळेत चार महिन्यांच्या संशोधनासाठी रुजू झाल्या. या कालावधीत त्यांनी नायजेरियातील ‘प्रपोपीस आफ्रिकाना’ या झाडाच्या सालीवर संशोधन सुरू केले. त्याच्या सालीमधील डिंकासारख्या चिकट स्रावात अनेक प्रकारचे सेंद्रिय पॉलीमर पदार्थ सापडतात. त्यांतील काही पॉलीमर अलग करून त्यांचा वापर औषधी गोळ्यांमध्ये करता येतो. या पॉलीमरमुळे औषधी गोळ्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरची विद्राव्यता वाढते. त्यामुळे रुग्णाला लागणाऱ्या औषधाची मात्रा कमी करता येते. तसेच हे पॉलीमर शरीराला अपायकारक नसून स्वस्तात उपलब्ध होते.नायजेरिया विद्यापीठाच्या डॉ. पेत्रा ओ. एन. यांनी तेथून फाइल केलेल्या पेटंटवर शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्यासह के. आय. टी. कॉलेजच्या डॉ. मोनिका सानंदम, भारती विद्यापीठाच्या फार्मसी कॉलेजचे डॉ. अनिलकुमार शिंदे, डॉ. नामदेव जाधव यांची सहसंशोधक म्हणून नावे आहेत. या सर्वांच्या चार महिन्यांच्या अथक संयुक्त परिश्रमांतून पेटंटयोग्य संशोधन साकारले आहे. भारतीय कायद्यानुसार हे पेटंट भारतातून फाइल करणे शक्य नसल्याने डॉ. पेत्रा यांनी ‘डीएसटी’च्या संमतीने या सर्वांच्या नावे ते पेटंट नायजेरियातून फाइल केले. ‘प्रपोपीस आफ्रिकाना’चा उपयोग‘प्रपोपीस आफ्रिकाना’ ही वनस्पती मुख्यत: आफ्रिका, अमेरिका व आशिया खंडांत सापडत असल्याची माहिती डॉ. सी. डी. लोखंडे यांनी दिली. ते म्हणाले, या झाडाचे अनेक उपयोग आहेत. त्याच्या बुंध्यापासून लाकडी सामान (फर्निचर) व बोटी तयार करतात. स्वयंपाकामध्ये त्याच्या बियांचा वापर केला जातो. त्याची पाने जनावरांना चारा म्हणून देतात. त्याच्या सालीमध्ये अनेक प्रकारचे उपयुक्त व गुणकारी पॉलीमर्स सापडतात.