शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रही गाजवावे

By admin | Updated: September 18, 2015 00:02 IST

वीरेंद्र भांडारकर : शहाजी महाविद्यालयाने पटकविली ‘क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी’

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची क्रीडा संस्कृती, सुविधा उत्तम आहेत. विद्यापीठाने खेळाडूंच्या विकासाच्यादृष्टीने उपक्रम राबवून देशाच्या क्रीडा क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचावे, असे प्रतिपादन भारतीय खेळ प्राधिकरणाचे औरंगाबाद विभागाचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी बुधवारी येथे केले. सर्वाधिक गुणांच्या जोरावर सलग तिसऱ्या वर्षी शहाजी महाविद्यालयाने ‘क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी’ पटकाविली.विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित ‘सन २०१३ व २०१४’ मधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.भांडारकर म्हणाले, अन्य विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठातील क्रीडा विषयक सुविधा चांगल्या आहेत. खेळाडूंना अधिक चांगले मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ देऊन देशात अव्वल स्थानी विद्यापीठाने पोहोचावे. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते शहाजी महाविद्यालयाच्या संघाला ‘क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी’ प्रदान करण्यात आली. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते. क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. एस. हुंसवाडकर यांनी सायटेशन सर्टिफिकेटचे वाचन केले. विजय रोकडे व दीपक डांगे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. माळी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप---विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या खेळाडू तसेच संघव्यवस्थापक, प्रशिक्षकांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, ब्लेझर व शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. यात व्ही. व्ही सुपुगडे, एस. ए. पवार, एस. बी. पाटील, विजय रोकडे, एन. एम. भैराट, पी. बी. पाटील, सी. एस. गिरी, डी. पी. डचाले, एस. ए. खराडे, एम. एस. सूर्यवंशी, एम. आर. पाटील, एस. एस. माळी, जे. एन. तांबोळी, अक्षय शिर्के, एकता शिर्के, रूपविकास घाग, उत्तम मेंगाणे, अमित निंबाळकर, ऋतुराज जाधव, सुनील कोनवडेकर, अजिंक्य चौगले, अजिंक्य रेडेकर, सुधाकर पाटील, वर्षा मोरे, प्रियांका मोरे, तेजस्विनी मोरे, गायत्री धर्माधिकारी, प्रियांका पन्हाळकर, मितेश कुंटे, प्रियांका मोरे, वर्षा मोरे, अक्षय निगडे, शुभम् फडके, महेंद्र कांदरे, सायली दरेकर, प्रणिता कोळी, तेजल पाटील, स्नेहल लाड, निशिगंधा शहापूरकर, प्रशांत शेळके, प्रणव सोनटक्के, विजय हजारे, प्रीतम चौगुले, नीलेश पाटील, रमेश सावंत, दीपक माने, राजू हक्के, रोहित कांबळे, सुरेश सावंत, प्रशांत थोरात, स्वप्निल यादव यांचा समावेश होता.खेळाडूंना दोन लाखजागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी निवड होणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत विद्यापीठातर्फे करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. ते म्हणाले, विद्यापीठातील क्रीडा सुविधांचा उपयोग करून खेळाडूंनी स्वविकास साधावा तसेच त्यांनी विद्यापीठाचा नावलौकिक करावा.