शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठ निकाल : कंत्राटी प्राध्यापकांमुळे मूल्यांकन रखडले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:59 IST

सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांमध्ये बहुतांश प्राध्यापक हे कायमस्वरूपी नसल्याने त्याचा फटका मूल्यांकनाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मदतीवरच विद्यापीठाच्या निकालाची मदार असल्याचे समजते.

मुंबई : मुंबई विद्यापीठात सध्या ८ लाख वाणिज्यच्या (बी. कॉम) उत्तरपत्रिकांचा समावेश असून त्यात २ लाख उत्तरपत्रिका या सेल्फ फायनान्सच्या अभ्यासक्रमांच्या आहेत. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांमध्ये बहुतांश प्राध्यापक हे कायमस्वरूपी नसल्याने त्याचा फटका मूल्यांकनाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मदतीवरच विद्यापीठाच्या निकालाची मदार असल्याचे समजते.दरम्यान, आयडॉलच्या २ लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि पारंपरिक अभ्यासक्रमांमधील १ लाख उत्तरपत्रिका या अनुदानित महाविद्यालयांच्या आहेत. तर उरलेल्या सर्व उत्तरपत्रिका या विनाअनुदानित महाविद्यालयांतील आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीचा कोटा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे उरलेल्या उत्तरपत्रिका कोण तपासणार, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांकडून विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून घेण्याचा पर्याय विद्यापीठासमोर उपलब्ध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वेळेत निकाल लावण्यासाठी याआधीच विद्यापीठ प्रशासनाने राज्यातील इतर विद्यापीठांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. इतर विद्यापीठातील प्राध्यापकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दर्जाही प्रशासनाने तपासला आहे. त्यात मुंबई आणि बाहेरील प्राध्यापकांच्या तापसणीमध्ये फारशी तफावत नसल्याची माहिती विशेष अधिकारी विनायक दळवी यांनी दिली. उरलेल्या उत्तरपत्रिकाही इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांकडून तपासून घेण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.२१७ निकाल बाकीमुंबई विद्यापीठातील एकूण ३०७ निकाल गुरुवारी रात्रीपर्यंत जाहीर झाले आहेत. तर अद्याप २१७ निकाल निकाल बाकी आहेत. गुरुवारी १ हजार ३८ प्राध्यापकांनी १९ हजार ७५८ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण केले.रखडलेले निकाल वेळेवर लावण्याचे प्रमुख आव्हान आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाºयांसोबत चर्चा सुरू असून लवकरच निकाल जाहीर केले जातील. हेल्प डेस्कचा आढावा घेऊन त्यातील त्रुटीही दूर केल्या जातील.- डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू