शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांच्या मागणीमुळेच विद्यापीठ कायद्याची अधिसूचना

By admin | Updated: January 14, 2016 00:23 IST

प्रस्तावित विद्यापीठ कायद्याबाबत शासनाकडून घाई केली जात नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांनी कायद्याबाबत अधिसूचना काढावी, असे सांगितले आहे. त्यामुळेच शासनाकडून अधिसूचना

पुणे : प्रस्तावित विद्यापीठ कायद्याबाबत शासनाकडून घाई केली जात नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांनी कायद्याबाबत अधिसूचना काढावी, असे सांगितले आहे. त्यामुळेच शासनाकडून अधिसूचना काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, कायद्याबाबत प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार केला जाईल, अशी ग्वाही उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘लोकमत’तर्फे पुण्यात प्रस्तावित विद्यापीठ कायद्यावर चर्चासत्र झाले होते. शासनाने विद्यापीठ कायदा घाईने मंजूर करु नये, शिक्षणतज्ञांशी चर्चा करुनच कायदा व्हावा, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ञांनी व्यक्त केली. याबाबत तावडे म्हणाले की, कायद्यामध्ये केवळ ५ टक्के मुद्यांबाबत आक्षेप आहेत. शासनातर्फे आवश्यक ते बदल केले जातील. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यापीठांवर लोकनियुक्त सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. शैक्षणिक गोष्टीबाबत ज्या ठिकाणी निर्णय घ्यायचे आहेत तेथे कुलगुरु व शोध समितीच्या माध्यमातून ‘नॉमिनेशन’ला प्राधान्य दिले आहे. तसेच ज्या ठिकाणी कुलगुरूंना उत्तरदायी राहायचे आहे, तेथे अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात येणार नसून उलट ती वाढणार आहे. (प्रतिनिधी)प्रस्तावित कायद्यात निधी खर्च करण्याबाबत विद्यापीठांवर बंधने टाकलेली नाहीत. मात्र, केलेल्या खर्चाची तपासणी करण्याचे नियम कडक केले आहेत. त्यामुळे विद्यापीठांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येणार नाही.विद्यापीठात पूर्वीआठ अधिष्ठाता २-३ तास काम करत होते. त्याऐवजी चार अधिष्ठाता पूर्वीच्या अधिष्ठात्यांपेक्षा तिप्पट वेळ काम करतील. बीसीयुडीचे पद कमी करून प्र. कुलगुरूंची पूर्ण वेळ नियुक्ती केली आहे. त्यामुळे कुलगुरू, प्र. कुलगुरू आणि चार अधिष्ठाता शैक्षणिक कामाकडे लक्ष देतीलपुढील शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत सर्व अधिकार कुलगुरूंकडे येतील. तत्पूर्वी लोकनियुक्त सदस्य विद्यापीठात येतील. त्यामुळे अधिसूचना काढली जाणार आहे. यास न्यायालयात आव्हान दिले, तरी अधिसूचना मार्च महिन्यात अधिवेशनात मंजुरीसाठी ठेवली जाणार आहे. सर्वपक्षीय मागणीमुळेच आम्ही अधिसूचना काढत आहोत. - विनोद तावडे, उच्च शिक्षण मंत्री