शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विद्यापीठाचा ‘माओवादी’ प्राध्यापक जेरबंद

By admin | Updated: May 10, 2014 01:34 IST

नक्षल चळवळीसाठी समन्वयक म्हणून काम करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्रा. जी.एल. साईबाबा याला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत अटक केली.

गडचिरोली पोलिसांची कारवाई : आंतरराष्टÑीय विभागाचा अध्यक्ष

अभिनय घोरपडे

गडचिरोली जहाल नक्षलवाद्यांच्या देशभरातील कामात सक्रिय असलेला आंतरराष्टÑीय विभागाचा अध्यक्ष तसेच देशपातळीवर नक्षल चळवळीसाठी समन्वयक म्हणून काम करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्रा. जी.एल. साईबाबा याला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत अटक केली. त्याच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असून शनिवारी (दि. १०) अहेरी न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे. साईबाबा हा इंग्रजीचा प्राध्यापक असल्याने त्याला नक्षल चळवळीत देशभर समन्वय ठेवणे सोपे जात होते. देशभरात सक्रिय असलेल्या बुद्धिवंताचा पाठिंबा या चळवळीला मिळवून देण्याचेही काम तो करीत असल्याचे जप्त केलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. या आधारे अहेरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या तिघांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्यास राज्याच्या गृहमंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर लगेच शुक्रवारी पोलिसांनी दिल्लीत जाऊन कारवाई केली. विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, गडचिरोली पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना व तपास अधिकारी सुहास बावचे यांच्या पथकाने दिल्लीत कारवाई केली. आॅक्टोबर महिन्यात दिल्लीत साईबाबाच्या घराची झडती घेण्यात आली होती. चौकशीत साईबाबा नक्षल चळवळीत सक्रिय असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. साईबाबा नक्षलवाद्यांच्या आंतरराष्टÑीय विभागाचा अध्यक्ष म्हणून काम बघत होता. त्यासाठी त्याने अनेकदा परदेशवार्‍याही केल्या होत्या.