माजी अधिकारी, सदस्यांना परीक्षा भवनात नो एन्ट्री : अधिकाऱ्यांवर कारवाई होणारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर नियंत्रण आणू न शकलेल्या प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांच्या निर्देशांवरून प्रशासनाने नवीन आदेश काढला आहे. यात विद्यापीठाच्या प्राधिकरणांवरील माजी सदस्य किंवा माजी अधिकाऱ्यांना परीक्षा भवनात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांच्यामुळे परीक्षा भवनाच्या कामात व्यत्यय येतो असे कारण यात देण्यात आले आहे. याशिवाय दररोज प्रसिद्धी माध्यमांमध्ये निघणारे धिंडवडे पाहता कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. विद्यापीठ हे सार्वजनिक कार्यालय असल्याचा प्रभारी कुलगुरू व प्रशासनाला विसर पडला आहे की काय, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांनी संबंधित परिपत्रक जारी केले आहे. विद्यापीठाचे माजी प्राधिकरण सदस्य किंवा माजी अधिकाऱ्यांचे परीक्षा भवनात सातत्याने येणे-जाणे असते. त्यामुळे कामात व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे विद्यापीठातील अधिकृत व्यक्ती, महाविद्यालयांचे प्राचार्य किंवा प्राधिकृत व्यक्तींशिवाय इतरांना परीक्षा भवनात प्रवेश देऊ नये, असे निर्देश या परिपत्रकातून देण्यात आले आहेत. माजी अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतच विद्यार्थ्यांना परीक्षा भवनात प्रवेश नाकारण्यात आला आहे. जर त्यांनी प्रवेश केला तर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
विद्यापीठात प्रवेशबंदी कशासाठी ?
By admin | Updated: August 18, 2014 00:30 IST