शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नावावर एकमत होईना : थोरल्या पवारांवर काहींची भिस्त

By admin | Updated: April 29, 2016 00:57 IST

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शहराध्यक्षपद निवडीसाठी बैठक आयोजित

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शहराध्यक्षपद निवडीसाठी बैठक आयोजित केली; पण आता कोणत्याही एका नावावर एकमत होत नसल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे. इच्छुकांपैकी काहींची भिस्त थोरल्या पवारांवर असून, त्यांच्या मार्फत काही होईल का, याची चाचपणी सुरू आहे; मात्र त्याचवेळी अजित पवारांकडे या गोष्टी जाऊ नयेत, याचीही काळजी घेतली जात आहे.महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या बड्या पक्षांनी शहराध्यक्षपदावर नव्याने नियुक्ती केली. महापालिकेच्या सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र त्याकडे दुर्लक्षच केले जात होते. विद्यमान अध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांची मुदत संपून बराच कालावधी लोटला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यासंबंधी काही निर्णय न घेता त्यांनाच काम पाहण्यास सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची निवड झाल्यानंतर, तरी बदल होईल, अशी अनेकांची अटकळ होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे काही इच्छुकांनी अजित पवार यांची भेट घेऊन पक्ष संघटनेसाठी बदल कसा आवश्यक आहे, ते सांगितले. त्यामुळेच फक्त या एका विषयासाठी पवार व तटकरे यांनी २ मे रोजी बैठक आयोजित केली असून, त्याची जोरदार चर्चा सध्या राष्ट्रवादीमध्ये आहे.आमदार, विधानसभा निवडणूक लढवून त्यात पराभूत झालेले विद्यमान नगरसेवक, काही बडे माजी नगरसेवक यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. भाजपा तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांची महापालिकेच्या राजकारणात मुरलेल्यांना शहराध्यक्षपद दिले आहे. तोच निकष राष्ट्रवादीनेही लावावा, असे सांगत काहीजण त्यासाठी आपणच योग्य असल्याचा दावा करीत आहेत. काही इच्छुक पक्षाची एका विशिष्ट जातीचा पक्ष, अशी प्रतिमा खोडण्यासाठी आपल्यालाच ते पद द्यावे, अशी मागणी करीत आहेत, तर काहींनी अल्पसंख्याकाना आता तरी संधी देणार की नाही, असा धोषा लावला आहे. काही ज्येष्ठांनी पक्षात अनेक वर्षे सक्रिय असतानाही बाजूला ठेवले असल्याचे शरद पवार यांना सांगत राजकीय वर्तुळातील संपर्क लक्षात घेऊन हे पद देण्याची मागणी केली आहे, असे समजते. (प्रतिनिधी)>४सर्व सहमतीने अध्यक्षाची निवड व्हावी, या हेतूने पवार यांनी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना बैठकीसाठी बोलाविले आहे. मात्र, इच्छुकांमध्ये एकमत होत नसल्याची माहिती मिळाली. आपणच कसे या पदासाठी योग्य आहोत, हे परस्परांना सांगण्यातच सर्व इच्छुक दंग आहेत. ४पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या अलीकडच्याच पुणे दौऱ्यात विद्यमान अध्यक्ष वंदना चव्हाण यांच्याशी या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली असल्याचे समजते. त्यामुळे या पदावर त्यांचीच फेरनिवड होण्याची किंवा त्यांच्या पसंतीने अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ं