शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बहुजनांची एकजूट

By admin | Updated: October 24, 2016 04:42 IST

जातीयवादी गुंडांवर कारवाई करा, दलितांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घाला, यांसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला पाठिंबा देणाऱ्या वेगवेगळ्या मागण्या करत

ठाणे : जातीयवादी गुंडांवर कारवाई करा, दलितांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घाला, यांसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला पाठिंबा देणाऱ्या वेगवेगळ्या मागण्या करत, रविवारी ठाण्यात संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आला, त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील सर्व दलित, आदिवासी, बौद्ध, ओबीसी आणि अल्पसंख्याक त्यात सहभागी झाले होते. या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित नसल्याने, मोर्चेकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि १५ प्रमुख मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांना दिले. शिष्टमंडळामध्ये श्याम गायकवाड, अ‍ॅड. राजय गायकवाड, अमित कटारनौरे, भास्कर वाघमारे, अनिश कुरेशी, चंद्रकांत जगताप आदींसह महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कॅडबरी कंपनी, कळवा नाका, तीनहात नाका आणि रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दलित, तसेच इतर समाजांतील नागरिकांचे जत्थे कोर्टनाका येथे एकत्र आले. तेथे त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. (प्रतिनिधी)अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी परिणामकारकरीत्या व्हावी, नाशिकला दलित समाजावर हल्ले करणाऱ्या जातीयवादी गुंडांवर कडक कारवाई करा, दलित-आदिवासींवरील जातीय अत्याचारांना पायबंद घाला, अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीची शासकीय श्वेतपत्रिकाजाहीर करा, कोपर्डीकांडातील नराधमांना फाशी द्या, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना व सूत्रधारांना फाशी द्या, विस्थापित भटक्या-विमुक्त समाजाचे आर्थिक-सामाजिक पुनर्वसन करा, ओबीसींचे घटनात्मक आरक्षण अबाधित ठेवा, मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करा, मराठा समाजाला संविधानातील तरतुदीअंतर्गत आरक्षण जाहीर करा, आदिवासींचे कुपोषण ताबडतोब थांबवा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रागतिक शेती धोरण जाहीर करा, कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल थांबवा, कंत्राटी पद्धत बंद करा, सर्व जमिनीचे राष्ट्रीयीकरण करा आदी मागण्या त्यांनी केल्या.