अतुल कुलकर्णी - मुंबई
लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली महायुती टिकवण्यासाठी शिवसेनेला आपल्या वाटय़ाच्या जागा कमी कराव्या लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. महायुतीमधील इतर पक्षांना
देखील सत्तासोपान जवळ वाटू लागल्याने त्यांनी मागणी केलेल्या जागांचीच बेरीज 1क्क्च्या पुढे गेल्याने युतीचे गणीत कागदावर तरी कोलमडले आहे.
त्यातच राष्ट्रवादीने काँग्रेसकडे 144 जागांची मागणी करुन शिवसेनेच्या शिडात हवा भरून वेगळे लढण्यासाठी इच्छाशक्ती निर्माण केली आहे. शिवसेना - भाजपा वेगळे लढावेत म्हणून राष्ट्रवादीचे काही अती वरिष्ठ नेते फिल्डींग लावून
आहेत. भाजपा-शिवसेना वेगळे लढण्यात त्यांना फायदा दिसत आहे. शिवसेना-भाजपाचा जागा वाटपाचा फॉम्यरूला 171-117 असा होता. मागच्या विधानसभेत शिवसेनेने 16क् तर भाजपाने 119 जागा लढवल्या होत्या. उर्वरित 9 जागा त्यांनी मित्रपक्षांना सोडल्या होत्या. त्यात सेनेने 44 तर भाजपाने 46 जागा जिंकल्या होत्या.
मात्र बदलेल्या राजकीय समिकरणात भाजपाला 119 जागा मान्यच नाहीत. त्यांना कमीत कमी 135 जागा पाहिजेतच. राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेने नेमक्या किती जागा हव्या, हे जरी स्पष्ट केलेले नसले तरी त्यांना किमान 40 जागा हव्या आहेत. रामदास आठवलेंच्या रिपाइंने 40 तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देखील 35 जागा हव्या आहेत. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने देखील किती जागा हव्या ते सांगितलेले नाही; मात्र त्यांचे सहकारी किमान 1क् जागांची मागत आहेत. या सगळ्यांची बेरीज 26क्च्या घरात जात आहे.
शिवसंग्रामचे विनायक मेटे म्हणाले, आमच्यामुळे तरुण मराठा महायुतीकडे वळाला. आता आम्हाला सन्मानजन्य जागा द्याव्यात. आम्ही किमान 1क् ठिकाणी तरी तयारी केलेली आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.
त्यामुळे शिवसेना स्वत:च्या जागा कमी करण्यास तयार नाही. त्यामुळे 288 पैकी महायुतीच्या घटक
पक्षांना 3क् जागांवर गुंडाळले जाईल आणि 13क्/128 जागांवर भाजपा सेनेचा समझौता होईल, असे
एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने स्पष्ट केले आहे. असे झाले तर शिवसेनेला
काही जागांवर पाणी सोडावे
लागेल आणि भाजपा जादा
जागांमुळे विजयी सुरुवात
केल्याचे सांगत सुटेल, असेही तो नेता म्हणाला.
च्महादेव जानकर लोकमतशी बोलताना म्हणाले, आमच्यामुळे युतीचा फायदा झाला. आता आम्हाला किमान 35 जागा पाहिजेत.
च्त्या नाही मिळाल्या तर, आपण वेगळा विचार करू. तिस:या आघाडीत जाणार का? असे विचारता ते म्हणाले, आपल्याला तिसरी आघाडी मान्य नाही.