शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

हरित वसईसाठी एकजूट होईना

By admin | Updated: January 19, 2017 03:35 IST

एमएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्याला वसईतून तीव्र विरोध होऊ लागला आहे.

शशी करपे,

वसई- एमएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्याला वसईतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. आराखड्याला विरोध करण्यासाठी वसईतील चर्चमध्ये तेथील फादरांच्या पुढाकाराने गावकऱ्यांच्या सभा होऊ लागल्या आहेत. त्याचवेळी इतर संघटनांनीही आराखड्याला विरोध करून आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे प्रखर विरोध असतांनाही वेगवेगळ्या चूली मांडल्या गेल्याने विरोधाची धार बोथट होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. वसई-विरार उपप्रदेशासाठी असलेला सिडकोचा नियोजन आराखडा २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएने नवीन विकास आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यात वसईचा हरितपट्टा नष्ट करण्याचा डाव रचण्यात आल्यामुळे वसईचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला आहे. त्यासाठी निमंत्रक म्हणून समीर वर्तक यांची नेमणूक करण्यात आली असून, या आराखड्याची माहिती देवून हरकती नोंदवण्याबाबतचे मार्गदर्शन जेष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांच्यामार्फत गावागावात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सिडको हटाव आंदोलनानंतर दोन दशकानंतर वसईतील चर्चमधून आराखड्याविरोधात जनजागृती केली जात आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो, चंद्रशेखर प्रभूंसह आराखड्याविरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सभा घेत आहेत. आतापर्यंत वसईतील बहुतेक चर्चमध्ये तेथील फादरांनी गावकऱ्यांना आराखड्याविरोधात हरकती नोंदवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे वसईच्या पश्चिम पट्ट्यात आराखड्याविरोधात उठाव होताना दिसत आहे. लोकशाहीमध्ये नेता नव्हे तर जनता सार्वभौम असते. सामान्य माणसाला अंधारात ठेऊन आराखडे तयार करणे ही लोकशाही विरोधी घटना आहे. एमएमआरडीचा नियोजित आराखडा मूठभर बिल्डरांच्या सल्लयाने व सोयीसाठी तयार झाला आहे. लोकांना विश्वासात घेतले गेले नाही. ही कृती घटनाविरोधी असल्याचा आरोप फादर दिब्रिटो यांनी केला आहे. लोकशिक्षण होऊ नये व जनतेने जागृत होऊ नये यासाठी हितसंंबंधी लोक प्रयत्नशिल असतात. ते दिशाभूल करून लोकांना गोंधळात टाकतात. ते व्यवस्थेचे दलाल असतात, असा आरोपही दिब्रिटो यांनी केला आहे. आराखडा वसई विरारला लागू नसेल तर कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने तो तयारच कशासाठी केला आहे? हा आराखडा सर्वांना कसा लागू आहे याची कबुली एमएमआरडीएने इंग्रजी वर्तमानपत्रात केलेल्या खुलाशात दिली असल्याचे दिब्रिटो यांनी सांगितले. दरम्यान, आराखड्याला विरोध करण्यासाठी पर्यावरण संरक्षण समितीकडून ३० जानेवारीला वसई तहसिल कचेरीसमोर फादर दिब्रिटो यांच्या नेतृत्वाखाली मौन उपोषण करण्यात येणार आहे. बिशप्स हाऊसचा समितीला पाठिंंबा असल्याने त्याला मोठा पाठिंंबा मिळेल असे जाणवते आहे. (प्रतिनिधी)>उद्देश एक आंदोलने मात्र होत आहेत तीनदुसरीकडे जनआंदोलन समितीने स्थापन केलेल्या वसई बचाव कृती समितीने येत्या २६ जानेवारीला एसटी बचावची मागणी करून चिमाजी आप्पा मैदानामधून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी २९ गावांना महापालिकेतून मुक्त करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेणे व एमएमआरडीएमध्ये समाविष्ट गावांना आराखडयातून मुक्त करावे अशी मागणीही करण्यात येणार आहे. तिसरीकडे, मनवेल तुस्कानो यांनी जनता दल (से.)मार्फतही गावागावातून हरकती नोंदवून घेण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर तुस्कानो यांच्या निर्भय जन संस्थेच्या माध्यमातून आराखड्याला विरोध करण्यासाठी गावागावात जनजागृती केली जात आहे. मात्र एकाच हेतूसाठी तीन संघटना वेगवेगळ्या मार्गाने लढा देत असल्याने हिरव्या वसईसाठी वसईकरांमध्येच एकजूट नसल्याचे चित्र समोर येत आहे.