शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

नव्या सिटी टॅक्सीविरोधात एकजूट

By admin | Updated: November 4, 2016 00:57 IST

महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१६ च्या मसुद्याला एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला़

पुणे : अखिल भारतीय पर्यटक परवान्यावर धावणाऱ्या कंपन्यांच्या टॅक्सींना अधिकृत करणाऱ्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या नवीन महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१६ च्या मसुद्याला एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला़ त्यातील पहिले पाऊल म्हणून या मसुद्याला विरोध करणाऱ्या हरकती परिवहन आयुक्तांकडे हरकती नोंदविण्याचे या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले़ पुण्यातील रिक्षा पंचायतीच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीला रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ़ बाबा आढाव, एसटीकामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, पुणे पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, निरुउद्दीन इनामदार, ट्रॅक्सी युनियनचे अध्यक्ष शिवाजी खांदवे, मोटार वाहन अधिनियमविषयक तज्ज्ञ अ‍ॅड़ पी़ बी़ शाळिग्राम, रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ शासनाने जाहीर केलेला अधिनियमांचा मसुदा म्हणजे रिक्षांसह टॅक्सी, शहरी बस व राज्य परिवहन महामंडळ या सार्वजनिक वाहतूक देणाऱ्यांना संपविण्याचा बेत आहे़ खासगी कंपन्यांना तकलादू नियमांची चौकट तयार करून त्यांना अधिकृत करून घ्यायचे, असे पद्धतशीर षड्यंत्र रचले आहे़ शहरी प्रवासी वाहतुकीसाठी शहर परिवहन सेवेतील कर्मचारी यांची अवस्था आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांसारखी होणे अपरिहार्य आहे़ या मसुद्यास हरकत नोंदवूनही तो अंतिम झाल्यास सर्व सार्वजनिक परिवहन सेवा ही अस्तित्वाची लढाई समजून एकजुटीने त्याला विरोध करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला़ त्यातील पहिले पाऊस म्हणून सर्व संघटना व त्यांच्या सदस्यांनी परिवहन आयुक्तांकडे या मसुद्यावर हरकती नोंदविण्यात येणार आहे़ याविषयी शासनाला एकजूट दाखविण्यासाठी रिक्षा, टॅक्सी, पीएमपी व एसटी या चार प्रमुख घटकांची या महिनाभरात डॉ़ बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले़ शासनाकडून रिक्षा, टॅक्सीचालकांना ते सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणून परवाना दिला जातो़ त्यांच्या रोजगारावर या अधिनियमामुळे अतिक्रमण होणार असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले़(प्रतिनिधी)>शासनाचा या मसुद्यातील काही तरतुदी भारतीय संविधानाच्या विरोधात तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीच्या विरोधात असल्याचे मत मोटार वाहननियमातील तज्ज्ञ अ‍ॅड़ पी़ बी़ शाळिग्राम यांनी या वेळी सांगितले़