शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नृत्याविष्काराचे अनोखे सादरीकरण

By admin | Updated: February 28, 2017 02:32 IST

संस्कृती कल्चरल अ‍ॅकॅडमीच्या वतीने ‘कलामंजिरी : दी ऱ्हीदम आॅफ लाइफ’ या महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले.

मुंबई : संस्कृती कल्चरल अ‍ॅकॅडमीच्या वतीने ‘कलामंजिरी : दी ऱ्हीदम आॅफ लाइफ’ या महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध नृत्यांगना रूपाली देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाच्या या दुसऱ्या वर्षी बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध नर्तक विशालकृष्ण यांचे कथ्थकनृत्य विशेष आकर्षण ठरले. त्यांनी अर्धनाटेश्वर, ताल-तीनताल व जयदेव रचित अष्टपदी यांचे पदलालित्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. बनारस घराण्याच्या पारंपरिक बंदिशी, बनारस चक्री व विशेषत: थाळीवरचे तलकार पाहून रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. दुसऱ्या प्रस्तुतीमध्ये भरतनाट्यम शैलीचे सुप्रसिद्ध नर्तक व गुरू वैभव आरेकर यांची नृत्य प्रस्तुती झाली. त्यांनी नर्मदा परिक्रमेच्या संकल्पनेवर आधारित ‘नर्मदे हर हर’ ही आध्यात्मिक अनुभूतीची नृत्यप्रस्तुती साकारली. नर्मदेचा उगम, तिच्या विविध स्थिती, तिची महती असा संपूर्ण प्रवास त्यांनी नृत्यप्रस्तुतीतून उलगडून दाखविला. सूक्ष्म अभिनय, उत्कृष्ट प्रस्तुतीतून जणूकाही रसिकांना नर्मदा परिक्रमेची अनुभूती दिली.शास्त्रीय स्वरूपाची जोपासना आणि सेवा करणारे अनेक महान नृत्यकलावंत भारतात होऊन गेले व आजही आहेत, त्या परंपरेला अनुसरून रंगमंचावर कलेचा आविष्कार व्हावा तसेच नवीन व बुजुर्ग कलाकार यांच्या सादरीकरणाचा आविष्कार महोत्सवाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता यावा, यासाठी असे महोत्सव सातत्याने होण्याची गरज आहे रसिकांनीही त्यांना आश्रय द्यावा, असे आवाहन प्रसिद्ध नृत्यांगना रूपाली देसाई यांनी या वेळी केले. संस्कृती कल्चरल अ‍ॅकॅडमीच्या भरतनाट्यम, कथ्थक आदी शास्त्रीय नृत्यांचा प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी कार्य केले जात आहे. विद्यार्थ्यांमधील नृत्याविष्कार घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांनादेखील वाव दिला जातो. (प्रतिनिधी)