शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

युनियन बँकेला ३८ कोटींचा फटका, तीन अधिका-यांसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: July 1, 2016 21:30 IST

युनियन बँकेच्या नागपूर आणि पुण्यातील तीन उच्चाधिका-यांसह ५ जणांविरुद्ध सीबीआयने गुन्हे दाखल केले. युनियन बँकेला ३८ कोटींचा फटका देणा-या एका कर्ज प्रकरणात

सीबीआयची कामगिरी : नागपूर, पुणे म्हैसुरात छापेनागपूर : युनियन बँकेच्या नागपूर आणि पुण्यातील तीन उच्चाधिका-यांसह ५ जणांविरुद्ध सीबीआयने गुन्हे दाखल केले. युनियन बँकेला ३८ कोटींचा फटका देणा-या एका कर्ज प्रकरणात संशयास्पद भूमिका वठविल्यावरून सीबीआयने ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. नागपूरातील एका कंपनीला युनियन बँकेच्या गोकुळपेठ शाखेने २००७ ते २०१२ या कालावधीमध्ये ३८ कोटी रुपये दिले. कॅश क्रेडिट लिमिट आणि टर्म लोन असे त्याचे स्वरूप होते. या कंपनीच्या संचालकांनी ही रोकड आपल्याच एका दुस-या कंपनीच्या खात्यात वळती केली. परंतू, कर्जाचे हप्ते फेडण्याचे टाळले. त्यामुळे बँकेच्या मुख्यालयामार्फत या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरू झाली. तेव्हा कंपनीच्या संचालकांनी पुरवठादारांची देयके बँकेकडे सादरच केली नसल्याचे उघड झाले. एवढ्या मोठ्या कर्जाच्या बदल्यात कंपनी संचालकाने बँकेकडे तारण केलेली मालमत्ता अल्पकिंमतीची होती. या प्रकारामुळे बँकेला ३८ कोटींचा फटका बसल्याने बँकेच्या शिर्षस्थ अधिका-यांनी सीबीआयकडे तक्रार नोंदवली. सीबीआयच्या स्थानिक युनिटने चौकशी केल्यानंतर बुधवारी नागपूर, पूणे आणि म्हैसुरातील कंपनीचे संचालक तसेच बँकेच्या अधिका-यांशी संबंधित कार्यालये आणि निवासस्थानी छापे घातले. छाप्यात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे युनियन बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक (पुणे), उपमहाव्यवस्थापक (नागपूर) आणि गोकुळपेठ शाखेचे सहायक महाव्यवस्थापक यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. तारण मालमत्ता आधीच अधिगृहितविशेष म्हणजे, कर्जदाराने बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता सरकारने आधीच अधिग्रहित केली होती, असे तपासात उघड झाले. प्रचंड रक्कमेचे कर्ज देताना बँकेच्या अधिका-यांनी त्याची साधी शहानिशा करण्याची का तसदी घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच उपरोक्त अधिका-यांनी वठविलेली भूमिका संशयास्पद असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे बँकेला ३८ कोटींचा गंडा घालणा-या कंपनीच्या २ संचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात आरोपी अधिका-यांची नावे तसेच अधिक माहितीसाठी सीबीआयच्या स्थानिक वरिष्ठांशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांच्याकडून आरोपींची नावे अथवा अन्य माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.