शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

अस्वस्थ शिवसेनेचे ‘तळ्यात-मळ्यात’!

By admin | Updated: February 12, 2015 05:18 IST

भाजपाचे कॅबिनेट मंत्री शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकार देत नाहीत, मुंबई महापालिकेत विश्वासात न घेता शासकीय पातळीवरून परस्पर निर्णय घेतले जातात आणि केंद्रातील आणखी एका मंत्रीपदाबाबत

मुंबई : भाजपाचे कॅबिनेट मंत्री शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकार देत नाहीत, मुंबई महापालिकेत विश्वासात न घेता शासकीय पातळीवरून परस्पर निर्णय घेतले जातात आणि केंद्रातील आणखी एका मंत्रीपदाबाबत विचारणाही केली जात नाही. अशा परिस्थितीत सत्तेत राहून स्वत:ची घुसमट करून घ्यायची की, कोणतेही अधिकार नसलेली वांझोटी सत्ता सोडायची, याबाबत शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात सुरु असतानाच भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक होत शिवसेनेची इच्छा नसेल तर बाहेर पडावे, अशी भूमिका घेतल्याने शिवसेना पक्ष नेतृत्व संभ्रमात असल्याचे समजते.केंद्र आणि राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी असली, तरी वाट्याला आलेली खाती तशी ‘बिनकामाची’ असल्याची भावना सेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे. दोन वर्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबईतील प्रकल्पांबाबत महापालिकेच्या परस्पर निर्णय घेतले जात आहेत, असा महापौरांचा आक्षेप आहे. तर भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नाहीत, अशी सेनेच्या राज्यमंत्र्याची तक्रार आहे. अधिकार देण्यावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या खात्याचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याचे समजते. राठोड यांनी हीच कैफियत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेत खदखद सुरू आहे.अशा पद्धतीने महापालिका निवडणुकांपर्यंत सत्तेवर राहिलो आणि ऐनवेळी भाजपाने युती न करता दगा दिला तर सत्तेमुळे आलेली अँटीइन्कम्बन्सी शिवसेनेला चिकटेल आणि भाजपा आपल्याला राष्ट्रवादी अथवा मनसेशी हातमिळवणी करून भुईसपाट करील, अशी भीती शिवसेनेतील अनेकांना सतावत आहे. त्यामुळे गपगुमान सत्तेत राहायचे की, संघर्ष करण्याकरिता रस्त्यावर उतरायचे याचा निर्णय घेण्याचा आग्रह आमदारांकडून धरला जात आहे. शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने विदर्भ व मराठवाड्यातील शिवसेना आमदारांची बैठक पुढील आठवड्यात बोलावण्यात आली असून त्यावेळी या विषयावरही चर्चा अपेक्षित आहे. (विशेष प्रतिनिधी)