शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

खासगी आयटीआयच्या अनुदानाचा प्रश्न अधांतरी

By admin | Updated: November 3, 2015 03:18 IST

राज्यातील २००० पूर्वीच्या कायम विनाअनुदानित खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अनुदान मिळत नसल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्याची दखल घेत कौशल्य विकास

मुंबई : राज्यातील २००० पूर्वीच्या कायम विनाअनुदानित खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अनुदान मिळत नसल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्याची दखल घेत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने कर्नाटक आणि गुजरात राज्यांतील आयटीआयची माहिती गोळा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. पण याला चार महिने उलटून गेले तरी प्रशासन याबाबत माहितीच गोळा करत आहे.खासगी आयटीआयला अनुदान देण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जून महिन्यात बैठक झाली. त्यात एका महिन्याच्या आत कर्नाटक आणि गुजरात राज्यांतील आयटीआयचा अभ्यास करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार कर्नाटक आणि गुजरात राज्यांतील शासकीय व खासगी आयटीआयची संख्या, जागेची उपलब्धता, अनुदान यांची माहिती संचालक (प्रशिक्षण) यांच्याकडून मागवण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र चार महिने उलटूनही प्रशासनाचा अभ्यास सुरू आहे. परिणामी, एका महिन्यात बैठक घेण्याचे आश्वासन देणाऱ्या प्रशासनाला साधी माहिती घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागत असेल, तर त्यावर निर्णय घेण्यासाठी किती कालावधी लागेल, असा प्रश्न आयटीआय संस्था चालकांमधून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)बैठकीला मुहूर्त कधी?वित्त व कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे मंत्री, अधिकारी आणि खासगी आयटीआय संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे जूनमध्ये झालेल्या बैठकीत ठरले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांत दोन वेळा बैठक घेण्याचा प्रयत्न झाला. आता दिवाळीपर्यंत बैठकीला मुहूर्त नसल्याचे समजते. कर्नाटक आणि गुजरात राज्यांतील आयटीआयच्या माहितीवर चर्चा करण्यासाठी मुहूर्त कधी, याकडे आयटीआय चालकांचे लक्ष लागले आहे.