शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्यात

By admin | Updated: June 28, 2016 02:12 IST

तांत्रिक त्रुटींमुळे दरवर्षी रेल्वे प्रवाशांना पाय धुवूनच स्थानकात प्रवेश करण्याचा प्रसंग अनुभवायला मिळत आहे.

नवी मुंबई : रेल्वे स्थानकालगतचे भुयारी मार्ग बनवताना झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे दरवर्षी रेल्वे प्रवाशांना पाय धुवूनच स्थानकात प्रवेश करण्याचा प्रसंग अनुभवायला मिळत आहे. बहुतांश भुयारी मार्ग पावसामुळे सध्या जलमय असून, सुमारे तीन ते चार फूट पाण्यातून प्रवाशांना जावे लागत आहे, तर वाहनांसाठी असलेले काही भुयारी मार्ग साचलेल्या पाण्यामुळे बंद पडत आहेत.पावसाची संततधार सुरू होवून अवघे चारच दिवस झाले असतानाच शहरातील बहुतांश रेल्वे स्थानकालगतचे भुयारी मार्ग जलमय झाले आहेत. त्याठिकाणी सुमारे तीन ते चार फूट उंचीपर्यंतचे पाणी साचले आहे. गाडी पकडण्यासाठी घाई गडबडीत येणारे प्रवासी भुयारी मार्गात साचलेले पाणी पाहून संताप व्यक्त करीत आहेत. परंतु स्थानकाबाहेर जाण्यासाठी अथवा आत येण्यासाठी भुयारी मार्गाशिवाय दुसरा पर्याय देखील नसल्यामुळे प्रवाशांना पाण्यातून चाचपडत वाट शोधत दुसरे टोक गाठावे लागत आहे. वाशी ते ऐरोली या ट्रान्स हार्बर मार्गावरील सहा स्थानकांसह खारघर, खांदेश्वर व पनवेल रेल्वे स्थानकालगतच्या भुयारी मार्गात प्रतिवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. मात्र सुमारे १५ वर्षांचा कालावधी होवून देखील त्यावर ठोस उपाय राबवण्यात प्रशासन अपयशी ठरलेले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी जिवाचा धोका पत्करत दररोज अनेकांना पाण्यातून जावे लागत आहे.कोपरखैरणेत वाहनांसाठी व पादचाऱ्यांसाठी असलेल्या दोन भुयारी मार्गात भिंत नाही. यामुळे एका ठिकाणी साचलेले पाणी दुसऱ्या मार्गात जावून दोन्ही भुयारी मार्ग पाण्याखाली जातात. यावेळी पाण्याने ठरावीक उंची गाठल्यानंतर वाहनांची रहदारी पूर्णपणे ठप्प होत आहे. यामुळे रहिवासी भागातून ठाणे-बेलापूर मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना घणसोली, कोपरखैरणे दरम्यानच्या महापे पुलाचा पर्याय वापरावा लागत आहे. तर पादचाऱ्यांना पाण्यातूनच अथवा रेल्वे रूळ ओलांडून जिवाचा धोका पत्करावा लागत आहे. अखेर दिवस-रात्र विद्युत मोटर लावून त्याठिकाणी साचलेल्या पाण्याचा उपसा केला जातो. दिवसभर पाऊस असल्यास मशीनमध्येही बिघाड होण्याचे प्रकार घडत आहेत. >कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली या रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचले नाही तर प्रवासी आश्चर्य व्यक्त करतील, अशी परिस्थिती आहे. त्यात मागील काही वर्षांपासून सानपाडा भुयारी मार्गातही पाणी साचण्याला सुरवात झाली असून यंदाही दोन दिवस झालेल्या पावसामुळे त्याठिकाणी दोन फुटाएवढे पाणी साचले आहे. तुर्भे व रबाळे येथील भुयारी मार्ग असूनही ते बंद ठेवण्यात आले आहेत, तर कोपरखैरणे, रबाळे व ऐरोली रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गात देखील हीच परिस्थिती आहे.