शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: May 19, 2014 03:22 IST

शिवसेनाप्रमुखांच्या स्वर्गवासानंतर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने तीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार होता.

नंदकुमार टेणी, ठाणे - शिवसेनाप्रमुखांच्या स्वर्गवासानंतर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने तीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार होता. जनता त्यावर शिक्कामोर्तब करते की त्यांना जनाधारापासून विन्मुख करते, त्याचप्रमाणे राज की उद्धव, या सामन्यात जनता कोणाच्या बाजूने उभी राहते, अशा प्रश्नांची उत्तरे ही निवडणूक देणार होती. निवडणुकीच्या निकालाने जनतेने उद्धव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले तर राजविरुद्धच्या सामन्यातही विजयी केले. त्यामुळे उद्धव यांचा प्रभाव पक्षात आणि पक्षाबाहेरही वाढला. शरद पवार आणि अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. आधी स्वत:चा पक्ष धड चालवा, मनोहर जोशी, मोहन रावले आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचा मान राखा, पक्षाला लागलेली गळती रोखा, असे टोले हे काका-पुतणे उद्धव यांना लगावत होते. या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची दुकानदारी संपुष्टात येईल, अशा वल्गनाही अजित पवार यांनी केल्या, तर पुतणे राज यांनी मृत्युशय्येवरील शिवसेनाप्रमुखांचा बटाटेवडा आणि चिकनचे सूप जाहीर सभेत उचकून काढले होते व औकात दाखवण्याची भाषा केली होती. तर उद्धव यांनी या सगळ्या प्रचाराला अत्यंत संयमी उत्तर दिले. शरद पवारांकडे स्वत:चे आहे काय? यांनी पक्ष काढला तो दोन्हीवेळा काँग्रेस फोडून. त्यांचे जे प्रमुख शिलेदार आहेत, ते कोण आहेत? गणेश नाईक, छगन भुजबळ, किरण पावसकर आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतल्या तिघांना इम्पोर्ट करून त्यांनी उमेदवार्‍या दिल्या आहेत. यांनी पुतण्या आणि मुलगी सोडली तर नेता म्हणून घडविले तरी कोणाला, असा सवाल उद्धव यांनी केला होता.