शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पॅकेजच्या अनिश्चिततेने साखर कारखानदारांत अस्वस्थतता

By admin | Updated: September 2, 2015 23:24 IST

बिलाकडे शेतकऱ्यांचे लक्ष : जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे ३१ आॅगस्टअखेर ५१६ कोटी ४६ लाख ९६ हजार उस बील थकीत

प्रकाश पाटील - कोपार्डे  हंगाम २0१४-१५ मध्ये वाढलेली एफ. आर. पी. आणि कोसळलेले साखरेचे दर यामुळे आर्थिक संकटात साखर कारखाने आले आहेत. परिणामी, संपूर्ण हंगामात गाळप झालेल्या उसाची एफ.आर.पी.प्रमाणे द्यावयाची रक्कमही भागविण्याची कुवत कारखानदारात राहिली नाही. हंगामाच्या शेवटच्या काळातील गाळप झालेल्या उसाच्या बिलांपोटी कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांकडे ५१६ कोटी ४६ लाख ९६ हजार ९७ रुपये थकबाकी आहे.हंगामी २0१४-१५ ची सुरुवात आक्टोबर २0१४ मध्ये झाली. यावेळी साखरेचा प्रतिक्विंटल दर ३१00 ते ३२00 रुपये होता. यात त्यानंतर सतत घसरण सुरू झाली. यामुळे साखर कारखान्यांना पैसे उपलब्ध करून देणाऱ्या राज्य सहकारी बँकेने प्रतिक्विंटल देण्यात येणाऱ्या उचलीमध्ये सातत्याने कपात करायला सुरुवात केली. याचा परिणाम एफ.आर.पी. देताना साखर कारखानदारांना मोठी आर्थिक कसरत करायला लागली.वाढलेली एफ.आर.पी. व घसरलेले साखरेचे दर यामुळे उत्पादन खर्चाचा ताळमेळ कारखानदारांना बसणे, त्यातच राज्य शासनाने जे साखर कारखाने एफ.आर.पी. देणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफ.आर.पी. दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांची एफ.आर.पी. २४00 ते २६५0 पर्यंत बसत असल्याने साखर कारखानदारांनी एफ.आर.पी. जाहीर केली. पण, ती देण्याची पद्धत बदलली.ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफ.आर.पी.प्रमाणे पैसे देण्याचे बंधन असताना पैशांची उपलब्धता होईल, तशी ती देण्याची सुरुवात केली. दोन महिन्यांचे गाळप करून उत्पादित झालेल्या साखर पोत्यांवर राज्य बँकेकडून मिळणाऱ्या उचलीतून शेतकऱ्यांची बिले अदा केली. राज्य शासनानेही कारखानदारांच्या आर्थिक अडचणी समजून घेऊन १४ दिवसांत एफ.आर.पी. देण्याचा कायदाही बासणात गुंडाळून ठेवला आहे.आता हंगाम २0१४ -१५ मधील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांत गाळप झालेल्या उसाची बिले हंगाम संपून सहा महिने झाले, तरी थकीत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांकडे ५१६ कोटी ४६ लाख ९६ हजार ९७ रुपये थकीत आहेत. तर सांगली जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडे ३२६ कोटी १७ लाख ३५ हजार ८६ अशी कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांची मिळून ८४२ कोटी ६४ लाख ३३ हजार रुपये ३१ आॅगस्टअखेर थकीत असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.ज्या साखर कारखान्यांच्याकडे सहवीज प्रकल्प व डिस्टिलरी विभाग आहेत. त्या कारखान्यांनी काही प्रमाणात फेब्रुवारीपर्यंतची ऊस बिले दिली आहेत. आता शिल्लक थकीत ऊस बिलांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल कारखान्यांनी प्रस्ताव दिले असले, तरी त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने कारखानदारांत अस्वस्था पसरली आहे.एफ.आर.पी.प्रमाणे द्यावयाची रक्कमही भागविण्याची कुवत कारखानदारात राहिली नाहीज्या साखर कारखान्याकडे सहवीज प्रकल्प व डिस्टिलरी विभाग आहेत. त्या कारखान्यांनी काही प्रमाणात फेब्रुवारीपर्यंतची ऊस बिले दिली आहेत.