शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

राणेंच्या हालचालींमुळे शिवसेनेत अस्वस्थता

By admin | Updated: April 14, 2017 01:41 IST

एकेकाळचे शिवसैनिक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. कारण, राणे भाजपात गेले

मुंबई : एकेकाळचे शिवसैनिक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. कारण, राणे भाजपात गेले तर कोकणमध्ये शिवसेनेच्या सामर्थ्याला भाजपाकडून मोठे आव्हान उभे राहू शकते. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा भाग शिवसेनेचा प्रभावपट्टा राहिला आहे. या भागातील कोकणी माणूस परंपरेने शिवसेनेबरोबर राहिला. मात्र, राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर विशेषत: कोकणात शिवसेनेसमोर एक आव्हान उभे राहिले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये राणे फॅक्टरचा फटका शिवसेनेला बसला. अलीकडे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ताही आणली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेने पराभव केला. मात्र, त्यांचे पुत्र नितेश आमदार झाले. दुसरे पुत्र नीलेश आधीच लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. असे असले तरी राणे हे कोकणातील महत्त्वाचे नेते आहेत आणि ते उद्या भाजपात गेले तर सध्या या भागात अस्तित्वहिन असलेल्या भाजपाला संजीवनी मिळणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या वर्चस्वाच्या लढाईत भाजपाच्या हाताशी या भागात इतकी वर्षे फारसे काही लागलेच नाही.आता राणे भाजपात गेले तर पक्षाला तेथे भक्कमपणे पाय रोवण्याची संधी मिळेल. ही बाब शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकते. राणे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत असताना शिवसेनेने मात्र कोणतीही प्रतिक्रिया आज दिली नाही. ‘नो रिअ‍ॅक्शन,’ एवढेच शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत म्हणाले.तथापि, सूत्रांनी सांगितले की, राणे भाजपात गेल्यास कोकणात शिवसेनेची रणनीती काय असावी याबाबत शिवसेनेत चर्चा सुरू झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)तो प्रभाव आज नाही- नारायण राणे २००५मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसवासी झाले तेव्हा मोठा राजकीय भूकंप झाला होता. ते तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. या वेळी ते भाजपात गेले तर त्यांचा मुलगा वगळता अन्य कोणी आमदार काँग्रेस सोडेल काय याबाबत साशंकताच आहे. तसेच प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी राणेंसोबत जातील, अशीही शक्यता नाही.