शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

चारित्र्यावर अकारण संशय घेणे म्हणजे क्रूरताच

By admin | Updated: October 25, 2015 01:42 IST

नवविवाहिता माहेर सोडून सासरच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा स्थितीतच तिच्या चारित्र्यावर अकारणीय संशय घेऊन तिला मानसिक त्रास

- दीप्ती देशमुख,  मुंबईनवविवाहिता माहेर सोडून सासरच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा स्थितीतच तिच्या चारित्र्यावर अकारणीय संशय घेऊन तिला मानसिक त्रास देणे आणि तिचे आयुष्य भयावह करणे म्हणजे क्रूरताच आहे, असे निरीक्षण वांद्रे कुटुंब न्यायालयाने नोंदविले. पत्नीच्या गरजांकडे लक्ष देणे आणि त्या भागवणे, ही पतीची नैतिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यास प्रतिवादी (पती) अपयशी ठरला आहे, असे म्हणत कुटुंब न्यायालयाने त्याच्या पत्नीने केलेला घटस्फोट अर्ज मंजूर केला. मधुचंद्राला जात असताना एका तिऱ्हाईताने पत्नीकडे बघितल्याने तिलाच सगळ्यांसमोर शिवीगाळ करणाऱ्या पतीपासून कुटुंब न्यायालयाने पत्नीची सुटका केली. समिधा पवार (बदललेले नाव) हिचा विवाह सागर पवार (बदललेले नाव) याच्याशी २८ नोव्हेंबर २००३ रोजी झाला. मात्र, सागर पवार मद्याच्या आहारी गेला होता व सतत संशय घेत होता. त्यामुळे समिधाने कुटुंब न्यायालयात घटस्फोट अर्ज केला होता. समिधाने केलेल्या अर्जानुसार, सागर मद्यपी असून, तो वैवाहिक कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरला आहे, तसेच तो अतिशय संशयी स्वभावाचे आहे.‘श्रीवर्धनला मधुचंद्राला जात असताना एका व्यक्तीने मला पाहिले. त्यावरून सागर सगळ्यांसमोर मलाच ओरडला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर किरकोळ कारणावरून सागर सतत माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि त्यावरून मारहाण करायचा,’ असे समिधाने घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे. ‘नवविवाहिता माहेर सोडून सासरच्या परिस्थितीशी जुळते घेण्याचा प्रयत्न करत असते. सासरची मंडळी आणि नवऱ्याचा स्वभाव समजावून घेण्याचाही ती प्रयत्न करत असते आणि अशा स्थितीत तिच्या चारित्र्यावर नाहक संशय घेऊन तिला मानसिक त्रास देणे आणि तिचे आयुष्य भयावह करणे म्हणजे क्रूरताच आहे,’ असे निरीक्षण कुटुंब न्यायालयाने नोंदवले. समिधाने सागर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावण्यासही अपयशी ठरला असल्याचे अर्जात म्हटले आहे. सागर दारू आणि जुगारासाठी लोकांकडून कर्ज घेत असे. मात्र, ते परत करीत नसल्याने लोक घरी मागायला यायचे. त्यामुळे अनेकदा अपमान सहन करावा लागला. घरखर्चासाठी सागर पैसे द्यायचा नाही. शिवीगाळ आणि संशय‘मधुचंद्राला जात असताना एका व्यक्तीने मला पाहिले. त्यावरून सागर सगळ्यांसमोर मलाच ओरडला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर किरकोळ कारणावरून सागर सतत माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि त्यावरून मारहाण करायचा,’ असे समिधाने घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे.