शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये अस्वस्थता!

By admin | Updated: December 8, 2015 02:35 IST

विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपामध्ये असलेली अस्वस्थता आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत लपून राहिली नाही

यदु जोशी, नागपूर विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपामध्ये असलेली अस्वस्थता आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत लपून राहिली नाही. विरोधकांकडून हल्ले होत असताना आणि मित्र पक्ष शिवसेनेची भूमिका स्पष्ट नसताना सगळे घट्ट राहा, असा आदेश भाजपा आमदारांना आजच्या बैठकीत देण्यात आला. विधान भवनातील भाजपाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांच्यासह सर्व मंत्री, आमदार उपस्थित होते. मित्र पक्ष शिवसेनेची भूमिका सरकारला सहकार्य करण्याची आहे की नाही, हे समजत नाही. ते प्रसंगी सरकारला अडचणीतदेखील आणू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या आमदारांनी एकोप्याने राहिले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. नागपूरचे अधिवेशन वादळीच होत असते. एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. सरकारवर हल्ला झाला तर समोरच्यांना बोलू न देता आपण आक्रमक व्हा, असे आवाहन खडसे यांनी केल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर नाही तर डर कशाला? आम्ही कोणीही भ्रष्टाचार केलेला नाही. खोट्यानाट्या आरोपांचे भांडवल करायचे आणि आमची बदनामी करायची, हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा जुना धंदा आहे. मी आणि माझे ज्येष्ठ सहकारी मंत्री एकेका आरोपाचे मुद्देसूद उत्तर देऊन त्यांना उघडे पाडू. आम्ही त्यासाठी सक्षम आहोत, तुम्ही चिंता करू नका. विरोधी पक्षात असताना आमच्यापैकी ५० टक्के लोक बोलायचे आणि उरलेले ती भूमिका उचलून धरत आक्रमक व्हायचे. आता आपण सत्तेत आहोत. २० टक्के लोकांनी बोलायचे आणि ८० टक्क्यांनी त्याचे जोरदार समर्थन करायचे, असे चित्र सभागृहात दिसले पाहिजे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. उपाययोजनांबाबत काही ठिकाणी नाराजीही आहे पण सरकार अनेक उपाययोजना करीत आहे पण तरीही त्या सभागृहाच्या माध्यमातून राज्याला सांगितल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. तूरडाळीच्या कथित घोटाळ्यावरून विरोधकांचे लक्ष्य असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले की, तूरडाळ घोटाळा आधी दोन हजार कोटींचा, चार हजार कोटींचा आणि आता तर आठ हजार कोटींचा असल्याचे सांगितले जात आहे. एक पैशाचाही घोटाळा झालेला नाही, हे आपण सप्रमाण सिद्ध करू. प्रदेशाध्यक्ष दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही मार्गदर्शन केले. लूज टॉक मत करोभाजपाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी, ‘मीडिया के सामने लूज टॉक मत करो,’ असा सल्ला आमदारांना दिला. सरकारबद्दल तुमची काही मते असतील तर ती पक्षात मांडा, बाहेर बोलण्याची गरज नाही. काही जण परस्पर मीडियाशी बोलतात आणि गैरसमज निर्माण होतात हे योग्य नाही, अशी कानउघाडणीही त्यांनी केली.