शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

सामाजिक ऋणानुबंधाची अखंड परंपरा

By admin | Updated: August 26, 2016 01:53 IST

स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी माटुंगा येथील प्रगती सेवा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम येत्या गणेशोत्सवात राबवण्यात येणार आहे

महेश चेमटे,

मुंबई- स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी माटुंगा येथील प्रगती सेवा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम येत्या गणेशोत्सवात राबवण्यात येणार आहे. सामाजिक भान जपण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रगती मंडळाच्या वतीने परिसरातील नागरिकांची आणि येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मोफत बुद्ध्यंक आणि भावनांक यांची तपासणी या वेळी करण्यात येईल. माटुंगा येथील अरोरा सिनेमाजवळील बी.आय.टी. चाळीत १९६६ साली उत्साही तरुणांनी सहा इंचांच्या गणेशमूर्तीची स्थापना करीत गणेशोत्सवास प्रारंभ केला. तेव्हापासून आजतागायत पारंपरिकतेची कास धरत प्रगती सेवा मंडळाने सामाजिक ऋणानुबंध जपत वारसा गणेशोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी मनुष्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बहुतांशी वेळा नकारात्मक भावना दूर सारून सभोवताली सकारात्मक ऊर्जेमुळे यशस्वी होण्याची गुरुकिल्ली सापडते. लोकमान्य टिळकांच्या मूळ उद्देश लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात उच्च भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी ‘मोरया संशोधन केंद्र’ हा अभिनव उपक्रम राबवणार आहे. त्याशिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रम सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही मंडळाचे अध्यक्ष अनिल गावंड यांनी दिली. बी.आय.टी. चाळीतील प्रत्येक पिढीने भक्तीसह सामाजिक भान जपले. कानाला झेपेल अशा ढोल-ताशांच्या गजरात प्रगतीच्या गणरायाचे आगमन होते. गणेशोत्सवाच्या काळात स्वत:चे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न यंदाही प्रगती मंडळाकडून करण्यात येणार आहे. गतवर्षात परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आर्थिक मदत, अदिवासी पाड्यांना भेट देणे अशा स्वरूपात अनोखी भक्ती केल्यानंतर यंदा मात्र मनुष्यबळाचा सुयोग्य वापर कसा करता येईल, या विषयावर काम करण्यात येणार आहे.>मूर्तीसाठी अहोरात्र काम करणाऱ्यांचा आणि गणेशभजनात अभंग-कीर्तनाने रात्र जागवणाऱ्यांचा मंडळाच्या वतीने गेल्या आठवड्यात सत्कार करण्यात आला. यात मूर्तिकार, सजावटकार, पदाधिकारी, लहान कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते या सर्वांचे अभिंनदन करण्यात येते. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या सूचनांची योग्य ती दखलही घेतली जाते. - कुलदीप पाटणकर, उपाध्यक्ष, प्रगती सेवा मंडळ