शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत सत्तांतराशिवाय विकास अशक्य- थरूर

By admin | Updated: January 31, 2017 02:18 IST

मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या

मुंबई : मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी यंदा महापालिकेत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले. यावेळेस काँग्रेसला संधी देऊन बघा, मुंबईत बदल घडेल आणि मुंबईचा विकास होईल, असा दावाही त्यांनी केला. युतीच्या कारकीर्दीतील गैरकारभाराबाबत काँग्रेसने तयार केलेल्या आरोपपत्राचेही थरुर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना थरूर म्हणाले की, ‘वीस वर्षे सत्तेत राहूनही मुंबईकरांना सुखकर जीवन देण्यात शिवसेना, भाजपा साफ अयशस्वी ठरली. आता तर भाजपा नेते पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहेत. प्रत्यक्षात पारदर्शकत कारभाराच्या आग्रहापोटी कॉंग्रेसने माहिती अधिकार कायदा आणला. पण, सत्तेवरील भाजपा सरकार माहिती अधिकारातही माहिती देत नाही. या सरकारला पंतप्रधानांची शिक्षणाची पदवी ते मुंबई महानगरपालिका यामध्ये कुठेही पारदर्शकता नको आहे, असा आरोप त्यांनी केला. पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेचे लेखापरीक्षणच केले नाही. याचा आता मुंबईकरांनी जाब विचारायला हवा , असे थरूर म्हणाले. यावेळी, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही युतीच्या कारभारावर टीका केली. पालिकेतील सर्व भ्रष्टाचारात आणि घोटाळ्यात भाजपाचाही तितकाच सहभाग होता. स्थायी समितीत भाजपाने शिवसेनेला मदत केली, मंजुरी दिली आणि आता युती तुटल्यावर भाजपा शिवसेनेवर आरोपपत्र दाखल करतेय. मुख्यमंत्री म्हणतात पालिकेत भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारात भाजपचाही सहभाग आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) - अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भाजपा मंदिर बांधणार तरी कसे, निवडणुका आल्या की मतांसाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे रेटण्यात येतो, असा आरोप शशी थरूर यांनी यावेळी केला.