शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी

By admin | Updated: June 30, 2014 23:53 IST

शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत.

पुणो : शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत. विशेष म्हणजे या नळजोडांची माहिती असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती, अपुरे मनुष्यबळ आणि सुरक्षे अभावी या नळजोडांवर कारवाई करणो महापालिकेस शक्य झालेले नाही. या नळजोडांमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनीही घेतलेल्या अनधिकृत नळजोडांचा समावेश असून त्यातील काही लोकप्रनिधींचींच्या घरात तर तब्बल डझनभर नळ जोड आहेत. त्यामुळे एकीकडे पालिका पाणीबचतीचा नारा देण्यासाठी आपला घसा कोरडा करीत असली तरी, दुसरीकडे मात्र, या अनधिकृत नळजोडांमुळे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. 
   शहरात सुमारे साडेसात लाख मिळकती आहेत. त्यातील सुमारे साडेपाच लाख रहिवासी मिळकती असून सव्वा लाख व्यावसायिक मिळकती आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 20 हजार मिळकतींनाच नळजोड देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती पालिका प्रशासनाकडे आहे तर तेवढेच अनधिकृत नळ शहरात असल्याची पालिकेची माहिती आहे. मात्र, या नळजोडांवर अद्याप कारवाई करण्याचे धाडस पालिका प्रशासनास झालेले नाही.(प्रतिनिधी)
 
मोटारीसाठी विशेष पथक 
पाणीकपातीच्या कालावधीत मोटारी लावून पाणी खेचणा:या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून संबंधित परिसरात आधी पाहणी करून त्यानंतर मोटारी वापणा:यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या अंतर्गत संबंधित नागरिकाची मोटार जप्त करण्यात येणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले.
 
कारवाईस गेल्यावर होते मारहाण 
अशा अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यासाठीची मोहीम महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षापासून उन्हाळ्यात हाती घेण्यात येते. मात्र, कारवाईस गेलेल्या पालिकेच्या कर्मचा:यांना मारहाण झाल्याच्या घटना या पूर्वी घडलेल्या आहेत. तसेच, कारवाईस गेलेल्या कर्मचा:यांना अनेकदा लोकप्रतिनिधींच्या रोषासही सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ही माहिती असूनही अनेकदा पालिका प्रशासन चुप्पी साधून असून, या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.
 
कपातीच्या काळामध्ये शहरात समान पाणीपुरवठा
पुणो : कपातीच्या कालावधीत शहरातील प्रभागांमध्ये समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, शहरात ज्या भागात  तांत्रिक कारणास्तव अथवा इतर कारणास्तव  24 तास अथवा सहा तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत आहे अशा भागांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या असून, त्याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने शहरात एक वेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही शहराच्या काही भागांत तांत्रिक चुकांमुळे 24 तास, तसेच  जाणीवपूर्वक दबावापोटी सहा तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे काही प्रभागात ओला दुष्काळ, तर काही प्रभागात कोरडय़ा दुष्काळाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे कपातीच्या कालावधीत समान पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडून प्रभागांमध्ये होणा:या पाणीपुरवठय़ांची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती सूत्रंनी दिली.(प्रतिनिधी)