शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत लेआऊट, बांधकामांना अभय; नगरविकास विभागाने काढला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 07:01 IST

राज्यातील शहरी भागांमधील अनधिकृत लेआऊट, त्यावरील अनधिकृत बांधकामांना सुधारित प्रशमन शुल्क (कम्पाऊंडिंग चार्जेस) आकारून नियमित केले जाणार आहे. नगरविकास विभागाने सोमवारी त्याबाबतचा आदेश काढला. 

मुंबई : राज्यातील शहरी भागांमधील अनधिकृत लेआऊट, त्यावरील अनधिकृत बांधकामांना सुधारित प्रशमन शुल्क (कम्पाऊंडिंग चार्जेस) आकारून नियमित केले जाणार आहे. नगरविकास विभागाने सोमवारी त्याबाबतचा आदेश काढला. विशिष्ट जागेवर जेवढा चटई क्षेत्र निदेशांक (एफएसआय) लागू आहे तेवढाच एफएसआय लेआऊट आणि वैयक्तिक भूखंडांसाठी दिला जाणार आहे. मात्र, मूळ अनुज्ञेय एफएसआयपेक्षा अधिकचे बांधकाम असेल तर ते नियमित करण्यासाठी अधिकच्या बांधकाम क्षेत्रासाठी वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यामधील (रेडिरेकनर) जमीन दराच्या १० टक्के नुसार जी रक्कम येईल ती भरावी लागेल. अनेक भूखंडांवर नियमानुसार जेवढी जागा रिकामी सोडावी लागते त्यावरही बांधकाम केले जाते. असेही बांधकाम नियमित करण्याची भूमिका घेतली असून अशा जागेतील  बांधकामासाठी रेडी रेकनर दराच्या १० टक्के रक्कम भरावी लागेल. स्थानिक प्राधिकरणाची परवानगी न घेता किंवा परवानगी घेणे शक्य असतानाही जमिनींचे तुकडे पाडून लेआऊट टाकले, त्यावरील भूखंडांची वारेमाप विक्रीही झाली. असे लेआऊट आणि त्यावरील बांधकामांना जादा शुल्क आकारून नियमित करण्याची भूमिका यापूर्वीदेखील घेण्यात आली होती.कोणाला होणार निर्णयाचा फायदा? महापालिका, अ, ब आणि क वर्ग नगरपालिका, प्राधिकरणे, नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रांसाठी हा निर्णय घेतला आहे. शहरांलगत अशा अनधिकृत लेआऊट आणि त्यावरील बांधकामांना गेल्या काही वर्षांमध्ये पेव फुटले. हे लेआऊट कालांतराने शहरांत आले. लेआऊटमध्ये नियमानुसार रस्ते, नागरी सुविधांसाठी जागाही नाहीत. नगरविकास विभागाच्या आदेशामुळे अनेक लेआऊट व बांधकामांवरील ‘अनधिकृत’ चा असलेला ठपका पुसला जाईल. तिप्पट शुल्क आकारणीनियमित निवासी लेआऊटसाठी जेवढे विकास शुल्क आकारले जाते त्याच्या तिप्पट प्रशमन शुल्क आकारून लेआऊट नियमित केला जाईल. स्थानिक प्राधिकरणाची परवानगी न घेता टाकलेल्या लेआऊटबाबत हा नियम असेल. या लेआऊटवरील व्यक्तिगत भूखंड नियमित करायचा असेल तरीही विकास शुल्काच्या तीनपट रक्कम भरावी लागणार आहे.