शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत लॅब जमवतात गल्ला

By admin | Updated: April 13, 2015 05:45 IST

सामान्य जनतेच्या खिशातून अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवाले वर्षाकाठी ८६४ कोटी रुपयांवर डल्ला मारत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे

पूजा दामले, मुंबईसामान्य जनतेच्या खिशातून अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवाले वर्षाकाठी ८६४ कोटी रुपयांवर डल्ला मारत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांची लूट तर होतेच; शिवाय या लॅबमधून मिळणाऱ्या रिपोर्टमुळे आरोग्यदेखील धोक्यात येते. आरोग्यासह राज्यातील नागरिकांची ही मोठी लूट असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे म्हणणे आहे. अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबमध्ये दिवसाला किमान २० रुग्णांची तसापणी होते. हे पाहता उपरोक्त आकडेवारी ही किमान आहे. राज्यात किमान ५ ते ६ हजार अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचे जाळे पसरलेले आहे. अनधिकृत लॅबची संख्यादेखील किमान आहे. या अनधिकृत लॅब फक्त ग्रामीण भागांतच नाही, तर शहरी भागांतही मोठ्या प्रमाणात आहेत. डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नोलॉजी अथवा तत्सम शिक्षण घेतलेली व्यक्ती स्वतंत्ररीत्या पॅथॉलॉजी लॅब सुरू करू शकत नाही. तरीही कायद्याला बगल देत स्वतंत्रपणे या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचे जाळे निर्माण झाले आहे. अनधिकृत लॅबमध्ये दिवसाला किमान २० रुग्णांची तपासणी गृहीत धरता प्रत्येक रुग्णाकडून किमान २०० रुपयांच्या तपासण्या केल्या जातात. वर्षाला ही उलाढाल किमान ८६४ कोटींच्या घरात जाते. प्रत्यक्षात ही उलाढाल यापेक्षाही अधिक असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी सांगितले. अशी होते फसवणूक...!अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबमुळे रुग्णांची फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एखाद्या व्यक्तीला ताप आल्यावर त्यास तत्काळ या पॅथॉलॉजी लॅबमधून मलेरिया, टायफॉईडची तपासणी करून घ्यायला सांगितले जाते. टायफॉईड आहे की नाही हे पाहण्यासाठी ‘विडाल टेस्ट’ केली जाते. प्रत्यक्षात ताप आल्यानंतर आठ दिवसांनी विडाल टेस्ट करून घ्यायची असते. मात्र ताप आल्यानंतर तीन ते चार दिवसांतच विडाल टेस्ट करायला सांगितले जाते; आणि ती टेस्ट पॉझिटिव्हदेखील येते. अनधिकृत लॅबच्या विडाल रिपोर्टचा अभ्यास केल्यास टायफॉईड ही आरोग्य क्षेत्रातील मोठी समस्या असल्याचे जाहीर करावे लागेल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.