शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा
2
राज्यसभेत विरोधकांची शक्ती वाढणार, 8 जागांच्या निवडणुकीनंतर समिकरण बदलणार
3
नागपूरची महिला मुलाला गावात सोडून पाकिस्तानात का गेलेली? समोर आलेलं कारण ऐकून हैराण व्हाल!
4
“महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका, नैतिकता शिल्लक असेल तर अमित शाह यांनी राजीनामा द्यावा”: संजय राऊत
5
'तो' बॉम्ब ठेवण्यासाठी आला, पण हातातच स्फोट झाला; दहशतवादी कृत्य की अन्य काही? अमृतसरमध्ये खळबळ
6
"पोलिसांनी सुपारी घेऊन भावाला ठार केलं"; एन्काउंटरमध्ये मृत खोतकरच्या बहिणीचा आरोप
7
पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत वाईट वर्तन! गर्दीतील व्यक्तीने केला चुकीचा स्पर्श, नेमकं काय घडलं?
8
IPL 2025च्या निरोप समारंभात ऑपरेशन सिंदूरमधील हिरोंचा होणार गौरव, BCCI ची मोठी घोषणा
9
देशद्रोहासाठी CRPF किंवा लष्कराच्या जवानांना काय शिक्षा मिळते? निलंबनासोबतच...
10
आत्मनिर्भरतेच्या दिशेन मोठे पाऊल; आता भारत स्वतःचे लढाऊ विमान बनवणार, केंद्राची मंजुरी...
11
"सगळे मेलेत, मीसुद्धा थोड्या वेळात…’’, त्या कुटुंबातील प्रमुखाने मरण्यापूर्वी प्रत्यक्षदर्शींना सांगितलं धक्कादायक कारण  
12
Ganga Dussehra 2025: आजपासून दहा दिवस गंगा दशहरा उत्सवात 'या' चुका टाळा आणि दिलेले नियम पाळा!
13
धक्कादायक! ३५ वर्षीय मामीचा १६ वर्षांच्या भाचावर जडला जीव; म्हणाली, "आता हाच माझा नवरा"
14
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का? एस. जयशंकर म्हणाले...
15
पाकिस्तानमध्ये 'गरिबी' वाढली; वर्ल्ड बँकेचा धक्कादायक अहवाल: 'या' एका कारणामुळे लोक झाले कंगाल
16
माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय; सुशील हगवणेचा व्हिडीओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप
17
रंग दाखविले! मेट्रो स्टेशनांचे काम तुर्कीच्या कंपनीला दिले; स्थानिक कंत्राटदारांनी पूर्ण करताच कंपनी पळाली...
18
“काही झाले तरी देशाच्या सुरक्षिततेशी तडजोड करणार नाही”; बांगलादेश आर्मीचा युनूस यांना इशारा
19
"तुम्ही तर हगवणे ग्रुपचे सदस्य निघालात", प्राची पिसाटला अश्लील मेसेज केल्यानंतर अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले...
20
"गप्प बसायचं नाही...", शिल्पा नवलकरांनी प्राची पिसाटचं केलं कौतुक; समीर विद्वांस, रुचिराचीही कमेंट

अनधिकृत झोपड्यांना सेनेचेही अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 05:54 IST

निवडणुकीचे वेध लागलेल्या शिवसेनेनेही अखेर कोलांटी उडी घेत १४ फुटांवरील झोपड्यांना अभय देण्याची मागणी केली आहे.

मुंबई : निवडणुकीचे वेध लागलेल्या शिवसेनेनेही अखेर कोलांटी उडी घेत १४ फुटांवरील झोपड्यांना अभय देण्याची मागणी केली आहे. आपली ही सर्वात मोठी व्होट बँक वाचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीने यापूर्वीच गळा काढला होता. त्यामुळे अचानक शिवसेनेलाही मानवतेचा बुधवारी साक्षात्कार झाला. मात्र भाजपाने या मुद्दावरही मित्र पक्षाशी असहकार कायम ठेवल्याने शिवसेनेची गोची झाली आहे.पावसाळ्यानंतर १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक असल्याने याचे तीव्र पडसाद उमटले. परंतु वांद्रे येथील बेहराम पाड्यामध्ये चार मजली झोपडी पडून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे १४ फुटांवरील झोपड्यांवर हातोडा मारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सर्वात मोठी व्होट बँक दुखविणे राजकीय पक्षांना निवडणुकीत महागात पडणार आहे. परिणामी आतापर्यंत बेकायदा झोपड्याविरोधात आवाज काढणाऱ्या शिवसेनेनेही यू टर्न घेतला आहे. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे १४ फुटांवरील एक मजली झोपड्यांना संरक्षण देण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे. या झोपड्यांना नोटीस पाठविणे थांबवावे, अशी सुचनाही त्यांनी केली. मात्र अशी मागणी म्हणजे शहराशी गद्दारी असल्याची भूमिका मांडून भाजपाने शिवसेनेला हादरा दिला. (प्रतिनिधी)विविध पक्षांचे मतदार विखुरलेमुंबईतील झोपड्यांमध्ये सुमारे ७० लाख लोकसंख्या आहे. यात दलित, मुस्लिम, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीयांची संख्या अधिक आहे. या झोपड्यांमध्ये विविध पक्षांचे व्होट बँक विखुरले आहेत. त्यामुळे पालिकेच्या कारवाईचा फाटका या पक्षांच्या मतांना बसू शकतो.फेररचनेमुळे आधीच मतदारांची विभागणी झाली असल्याने राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. त्यात या कारवाईमुळे त्यांची पाचावर धारण बसली आहे.