शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

'ते' बांधकाम अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:21 IST

खासदार विकास कार्यक्रमाअंतर्गत कुर्ला नेहरूनगर येथे म्हाडा आणि महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता केलेले व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम वादाच्या भोवºयात सापडले आहे.

मुंबई : खासदार विकास कार्यक्रमाअंतर्गत कुर्ला नेहरूनगर येथे म्हाडा आणि महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता केलेले व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम वादाच्या भोव-यात सापडले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने याबाबतच्या सर्व परवानग्या सादर करण्यासाठी झोपडपट्टी सुधार मंडळाला पत्र पाठविले आहे.नेहरूनगर येथील इमारत क्रमांक ४६शेजारील भूखंडावरील या व्यायामशाळेसभोवतालचा बराचसा भाग अनधिकृत वास्तूत सामावून त्यावर स्लॅब टाकून पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करण्यात आले आहे. तरी या बांधकामासंबंधित परवानग्या नसतील, तर तत्काळ कारवाई करून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात यावे, असे निवेदन चुनाभट्टी येथील रहिवाशांनी म्हाडाच्या मुख्य अधिकाºयांना सादर केले आहे.हा भूखंड डीपीआरजीकरिता राखीव असताना, तेथे पूर्वी आमदार निधीतून स्वयंभू मित्रमंडळाच्या व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात आले होते. नियमांप्रमाणे मोकळ्या भूखंडाच्या १० टक्के बांधकाम करणे क्रमप्राप्त असते, तरीही म्हाडाचे सर्व नियम डावलून कोणत्याही परवानगीशिवाय सदर वास्तू अस्तित्वात होती. त्यानंतर, आता या वास्तूचे खासदार विकास कार्यक्रमांतर्गत दुरुस्तीच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने मूळ वास्तूच्या तिप्पट बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे खासदार पूनम महाजन यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या या व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, अशा तक्रारी या विभागातील नागरिकांकडून वारंवार येत आहेत.या बाबीची गांभीर्याने दखत घेऊन, या बांधकामासाठी आपल्यामार्फत देण्यात आलेल्या परवानगींचा लेखी स्वरूपात अहवाल सादर करावा, असे पत्र म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी झोपडपट्टी सुधार मंडळाला पाठविले आहे. याबाबत लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या विभागातील नागरिकांनी केली आहे.