शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’चा धाक दाखवत अनधिकृत बांधकाम

By admin | Updated: August 15, 2016 03:26 IST

पोलीस अधिकाऱ्याने रहिवाशांना खाकीचा धाक दाखवत चेंबूरच्या विष्णूनगरमध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे.

मुंबई : वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने रहिवाशांना खाकीचा धाक दाखवत चेंबूरच्या विष्णूनगरमध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत रहिवाशांनी पालिकेसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून तक्रार केली असली तरी अद्यापही याप्रकरणी काहीच कारवाई झालेली नाही.चेंबूरचा विष्णूनगर परिसर पुर्णपणे झोपडपट्टीचा असून तो डोंगरावर वसला आहे. काही वर्षांपूर्वी डोंगराचा काही भाग कोसळल्याने झोपडीधारकांना पालिकेने दुसऱ्या ठिकाणी जागा दिली. यात या पोलीस अधिकाऱ्याच्या घराचा समावेश होता. पूर्वी हा पोलीस अधिकारी याच परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तेव्हापासून तो येथे रहिवाशांसोबत दादागिरी करत जागा बळकावत आहे. पालिकेने पर्यायी जागा दिल्यानंतर तो राहत असलेली पूर्वीची जागा ही रिकामी होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून याठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवाचा कार्यक्रम घेतला जात होता. मात्र काही महिन्यांपूर्वी हा पोलीस अधिकारी पुन्हा याठिकाणी आला. त्याने पुन्हा ही जागा काबीज करुन येथे दोन झोपड्या उभ्या केल्या आहेत.येथील रहिवाशांनी या अनधिकृत बांधकामाला अनेकदा विरोध केला. मात्र हा पोलीस अधिकारी रहिवाशांना खाकीचा धाक दाखवत त्यांचा आावाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काही रहिवाशांनी त्याच्याविरोधात पालिका आणि वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्याने संबंधितांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे रहिवाशांंमध्ये भीतीचे वातावरण असून ही जागा हडपल्याने यावर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा कुठे करायची? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हा अधिकारी याठिकाणी अशाप्रकारे अनधिकृत बांधकामे करत आहे. पहिल्यांदा पत्र्याचे घर तयार केल्यानंतर काही दिवसांनी ही घरे पक्की करुन तो विकत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे गृह विभागाने अशा पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात पालिका आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई न केल्यास पालिका आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा येथील मनसेचे शाखा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)