शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानातील अनधिकृत बांधकाम अखेर हटविले

By admin | Updated: October 3, 2016 03:01 IST

उद्यान बळकावण्याच्या प्रयत्नात केलेल्या अनधिकृत बांधकामाचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर संबंधिताने ते बांधकाम हटवले आहे.

नवी मुंबई : उद्यान बळकावण्याच्या प्रयत्नात केलेल्या अनधिकृत बांधकामाचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर संबंधिताने ते बांधकाम हटवले आहे. घणसोली विभाग अद्याप हस्तांतरणाच्या वादात अडकलेला असल्याची संधी साधत संबंधिताने हे बांधकाम केले होते. परंतु जलवाहिनीवर बांधलेली भिंत अद्याप तशीच असल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत रहिवाशांकडून संशय व्यक्त होत आहे.घणसोली सेक्टर ५ येथील उद्यान बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. घणसोली विभाग अद्याप महापालिकेला हस्तांतर झालेला नाही. त्यामुळे सिडको व महापालिकेच्या रेंगाळलेल्या प्रक्रियेत रहिवासी भरडले जात आहेत. गेली १५ वर्षे स्थानिकांना चांगले उद्यान, खेळाचे मैदान, चांगले रस्ते अशा सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. दोन प्रशासनातील लेटलतिफ कारभाराचा गैरफायदा घेत त्याठिकाणच्या उद्यानाची भिंत पाडून उद्यानाचा काही भाग बळकावण्याचा प्रयत्न त्याठिकाणी सुरू होता. ज्यांच्याकडून हा प्रकार केला जात होता, त्यांच्याकडून यापूर्वी देखील त्याठिकाणी नियमांचे उल्लंघन करत विनापरवाना बांधकाम झालेले आहे. त्यानंतरही सिडको व पालिका अधिकारी त्याठिकाणच्या अनधिकृत बांधकामाकडे डोळेझाक करत असल्याचा संताप स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. याला वाचा फोडत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच संबंधिताने स्वत:हून वाढीव बांधकाम हटवले आहे. परंतु उद्यानालगतच्या जलवाहिनीवर देखील संबंधिताकडून बांधण्यात आलेली भिंत तशीच आहे. त्यावर तरी प्रशासन कारवाई करेल का? व भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितावर ठोस कारवाई होईल का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)