शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर बसविणार छत्री

By admin | Updated: March 21, 2017 03:33 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त चैत्यभूमीवर देण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त चैत्यभूमीवर देण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर झाली. मुंबईतील कुपरेज गार्डन येथील डॉ. आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर ब्रांझची छत्री बसविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि वरिष्ठ अधिकारी तसेच नागसेन कांबळे, भन्ते करुणानंद थेरो, चंद्रकांत कसबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.१४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट दाखिवण्यात येईल. तसेच लोकराज्य मासिकाचा विशेष अंक काढावा, चैत्यभूमी येथील स्तुपाचे काम या वर्षी पूर्ण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इंदू मिल जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दोन महिन्यात सुरू होईल. ते दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. येत्या काही दिवसात या जागेचे हस्तांतरण पत्र राज्य शासनाला मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. कुपरेज गार्डन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर बसविण्यात येणारी छत्री ही सात फूट गोल व साडेतीन फूट उंच असणार असून ती संपूर्ण ब्रांझमध्ये बनविण्यात येणार आहे. या परिसरात संविधान व डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटाची माहिती असलेले फलक लावण्यात येणार आहेत. तसेच विद्युत दिव्यांची सोयही करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासन १२ लाख रु पये देणार असून उर्वरित रक्कम महापालिकेकडून मिळणार आहे, अशी माहिती देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)