शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उमरोलीचा कचरा उल्हास नदीत

By admin | Updated: July 18, 2016 03:09 IST

उमरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये दररोज जमा होणारा कचरा उल्हास नदीतील वावे नदीपात्रात टाकण्यात येत आहे.

कांता हाबळे,

नेरळ- कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये दररोज जमा होणारा कचरा उल्हास नदीतील वावे नदीपात्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाणी दूषित होत असून सरपंच, ग्रामसदस्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. उमरोली ग्रामपंचायत हद्दीत डिकसल, उमरोली, वावे, कोषाणे, पाली, पोतदार वसाहत ही गावे येत आहेत. सर्व गावांतील कचरा डंपिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी थेट घंटागाडीतून उल्हास नदीत टाकला जात आहे.त्यामुळे पाणी दूषित होत आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत असल्याने गावांमध्ये हे दूषित पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगराई, साथीचे आजार बळावण्याचा धोका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार संतापजनक आहे. सरपंचांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. हा कचरा डम्पिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेवर टाकण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत सरपंच मोनिका सालोखे यांच्याशी संपर्कसाधला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच उपसरपंच सोपान ठाणगे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही कचरा नदीपात्रात न टाकता खड्ड्यात टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.>नदीचे पाणी दूषितसर्व गावांतील कचरा डम्पिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी थेट घंटागाडीतून उल्हास नदीत टाकला जात आहे. त्यामुळे पाणी दूषित होत आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत असल्याने गावांमध्ये हे दूषित पाणी जाण्याची शक्यता आहे