शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘उमंग’ला तिन्ही खानची दांडी!

By admin | Updated: January 23, 2017 04:17 IST

एरव्ही मुंबई पोलिसांच्या भूमिका साकारून कोट्यवधींचा गल्ला जमवणाऱ्या बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींचा दुटप्पीपणा

मुंबई : एरव्ही मुंबई पोलिसांच्या भूमिका साकारून कोट्यवधींचा गल्ला जमवणाऱ्या बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींचा दुटप्पीपणा शनिवारी समोर आला आहे. मुंबई पोलिसांसाठी शनिवारी सायंकाळी आयोजित ‘उमंग’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाकडे बॉलिवूडमधील तिन्ही ‘खान’सोबत कपूर कुटुंबीयानेही पाठ फिरवली होती. बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेल्या आमिर, सलमान आणि शाहरूख यांच्यापैकी किमान एक स्टार या कार्यक्रमात येणे अपेक्षित होते. मात्र हे तिन्ही सुपरस्टार कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने अधिक चर्चा झाली. उमंगसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे सुपरस्टार म्हणून नावाजलेल्या अजय देवगण यानेही या कार्यक्रमाला दांडी मारली. सलमान खान शाहरूख खानच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त असल्याचे कारण समोर आले आहे. मात्र त्याची कमतरता अभिनेत्री युलिया वेंतूरने भरून काढली. सलमानची खास मैत्रिण म्हणून युलियाची ओळख आहे. याउलट पोलिसांच्या भूमिका साकारून हेच स्टार कोट्यवधींचा गल्ला जमवतात. शिवाय त्यांच्या संरक्षणासाठी हेच पोलीस दिवसरात्र खडा पहारा देत असतात. मात्र याच पोलिसांच्या मनोरंजनाची वेळ आल्यावर या कलाकारांना काही मिनिटेही देता येत नाहीत का?, यावर उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता शाहिद कपूर, अभिनेता अर्जुन कपूर, गायक सोनू निगम आणि अनेक दिग्गजांनी यावेळी आपल्या अदाकारीने पोलिसांना भुरळ घातली. (प्रतिनिधी)