शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या फोनची वाट पाहतेय उज्मा शेख

By admin | Updated: January 24, 2016 00:38 IST

इसिसमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी भारतातील प्रमुख म्हणून काम करत असल्याच्या संशयावरून मुंब्रा येथील मुदब्बीर शेख (३५) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी पहाटे

- पंकज रोडेकर/ कुमार बडदे , ठाणे / मुंब्राइसिसमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी भारतातील प्रमुख म्हणून काम करत असल्याच्या संशयावरून मुंब्रा येथील मुदब्बीर शेख (३५) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी पहाटे अटक करून नेताना त्याची माहिती फोनवर क ळवू, असे सांगण्यात आले होते. मात्र, २४ तास उलटले तरीही एनआयए अथवा स्थानिक पोलिसांचा फोन न आल्याने त्याची पत्नी उज्मा या चिंताक्रांत झाल्या आहेत.घरातला फोन वाजला तर तो आपल्या पतीची माहिती देण्याकरिता आलेला असेल, असे वाटून उज्मा झटपट फोन घेत आहेत. परंतु, पतीची खबर देणारा फोन न आल्याने शेख कुटुंब चिंतेत आहे. ते आपल्या पतीला घेऊन मुंबईला गेलेत की दिल्लीला, काही कळत नाही. कुणी ते मुंबईत असल्याचे तर कुणी दिल्लीला असल्याचे सांगते. कुणाशी बोलायचे व कुणाला भेटायचे, ते माहीत नाही. त्यामुळे आता लवकरच वकील घेऊन मुंबईत एटीएसचे कार्यालय गाठायचे शेख कुटुंबाने ठरवले आहे. आम्हाला चांगला वकीलही माहीत नाही, असे उज्मा यांनी सांगितले.मुदब्बीरला मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातून अटक झाली, अशी वृत्ते वाहिन्या व वृत्तपत्रांत शनिवारी झळकली. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. मात्र, शनिवारी अमृतनगर परिसरात फेरफटका मारला असता इसिसचा म्होरक्या या भागातून पकडला गेला, याचा लवलेशही लोकांच्या बोलण्यात जाणवला नाही. मुदब्बीरच्या घरापाशी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे कॅमेरे, ओबी व्हॅन यांची गर्दी होती. शेख कुटुंब घर बंद करून दुसरीकडे गेले असेल, ही शक्यताही फोल ठरली. उलटपक्षी उज्मा व मुदब्बीरच्या घरातील अन्य मंडळी ही प्रसिद्धिमाध्यमांना रीतसर प्रतिक्रिया व माहिती देत होते. त्यांचे वागणे-बोलणे हे सर्वसामान्य वाटले. शुक्रवारी पहाटे पोलीस घरी आले. त्या वेळी मुदब्बीरची घरात चौकशी करून त्याच्यासह काही सामान घेऊन गेले. त्याला घेऊन जात असताना कुठे नेत आहात, अशी विचारणा आम्ही सातत्याने केली. मात्र, पोलिसांनी काहीच सांगितले नाही. आमच्या फोनची वाट पाहा. एवढेच पोलिसांनी सांगितले, असे उज्मा सांगत होत्या. त्यांना दोन लहान मुली असून त्या घरातच खेळत होत्या. परिसरात शांतता...मुदब्बीरला अटक केल्यानंतरही तो राहत असलेल्या परिसरात आणि मुंब्रा शहरात शांतता होती. मुदब्बीरच्या घराजवळील शाळा, दुकाने, कार्यालये येथील व्यवहार सुरळीत सुरू होते.इसिसविरोधात मौलानांची जनजागृतीइस्लाम धर्म हा शांतताप्रिय धर्म असून निरपराधांचे बळी देऊ नका, हीच धर्माची शिकवण आहे. या धर्माची खरी ओळख इस्लामच्या अनुयायांना व्हावी, याकरिता येत्या शुक्रवारी विशेष नमाजाच्या वेळी मशिदीत जनजागृती करण्यात येणार असल्याचे मौलाना सलामत तुल्ला नदवी यांनी सांगितले. एका व्यक्तीच्या चुकीचे खापर मुंब्रा येथील पाच लाख मुस्लीम नागरिकांच्या शिरावर फोडू नये, असेही ते म्हणाले.